आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • An FIR Registered Against Salman Khan’S Cousin

सलमानच्या आत्येभावावर तरुणीचा पाठलाग केल्याचा आरोप, दाखल केला FIR

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटोः सलमान खानचा आत्येभाऊ अब्दुल्ला खानच्या विरोधात एका तरुणीचा पाठलाग केल्याचा आरोप लागला आहे)
मुंबई- बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या आत्येभावाच्या विरोधात एका तरुणीचा पाठलाग केल्याचा आरोप लागला आहे. सांगितले जाते, की 25 वर्षीय ज्या तरुणीने मुंबईच्या ओशिवाडा ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे, ती सलमानची आरोग्य सल्लागार (डायटिशिअन) होती. आरोपी अब्दुल्ला मिर्झा खान सलमानचे वडील समील खान यांच्या बहिणीचा मुलगा आहे.
काय आहे प्रकरण?
ओशिवाडा ठाण्यातील पोलिस अधिका-यांच्या सांगण्यानुसार, 'सोशल नेटवर्किंग साइटच्या माध्यमातून संपर्क करण्याचा प्रयत्न करत असल्याच्या आरोपात अब्दुल्लाच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे. त्याच्यावर फेसबुक, इंस्टाग्रामसारखे साइट हॅक केल्याचासुध्दा आरोप आहे.' एफआयआरमध्ये अब्दुल्लाला सलमान खानचा नातेवाईक असल्याचे सांगण्यात आले आहे. अब्दुल्लाने पिडीत तरुणीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवला होता, असाही आरोप आहे. मात्र तिने त्याच्या लग्नाचा प्रस्ताव नाकारल्यानंतर आरोपी तरुणीला मेल, व्हाट्सअॅप, एसएमएस आणि फोन करून त्रास देत होता.
जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप-
अब्दुल्लाने पिडीत तरुणीला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. त्यानंतर तिने माझे सोशल साइट हॅक केल्याचा आणि अश्लिल मेसेज पोस्ट केल्याचासुध्दा आरोप लावला आहे. तरुणीची वकील अभा सिंह यांनी सांगितले, 'हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली तक्रार दाखल करण्यात आली आहे.' त्याच्या विरोधात कलम 506,509,427,66(a)(c)66 आणि 354 (D) अंतर्गत तक्रार दाखल झाली आहे. अद्याप या आरोपात आरोपीला अटक झालेली नाहीये.