आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनिल कपूर यांनी ऑस्ट्रेलियामध्ये फडकावला तिरंगा, \'जय हिंद\'चे लावले नारे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मेलबर्न- स्वातंत्र दिनाच्या दिवशी बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर यांनी मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)च्या फेडरेशन स्क्वायरवर झेंडा फडकावला. या इव्हेंटला अनिवासी भारतीयांसह राज्य प्रमुखसुध्दा उपस्थित होते.
अनिल कपूर यांनी इव्हेंटची काही छायाचित्रे टि्वटरवर शेअर केली आहेत. ही छायाचित्रे शेअर करून त्यांनी लिहिले, "What an honour for an Indian Citizen to hoist our National Flag on Independence Day at Federation Square in Melbourne".

शिवाय अनिल यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओसुध्दा पोस्ट केला आहे, त्यामध्ये ते 'जय हिंद'चे नारे लावताना दिसतात. अनिल मेलबर्न इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये 'दिल धडकने दो' आणि 'मिस्टर इंडिया' हे आपले दोन सिनेमे प्रेजेंट करण्यासाठी गेले होते.
एक्सिलेन्स इन वर्ल्ड सिनेमा अवॉर्ड पटकावला-
मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलदरम्यान अनिल कपूर यांनी एक्सिलेन्स इन वर्ल्ड सिनेमा पुरस्कार मिळवला. अनिल कपूर यांनी टि्वटरवर याविषयी माहिती दिली. आपला आनंद व्यक्त करत त्यांनी लिहिले, "Truly overwhelmed & humbled to receive the Excellence in World Cinema Award. Thank you @IFFMelb for this huge honour."
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, झेंड्याला वंदन करताना आणि मेलबर्न फिल्म फेस्टिव्हलमधील अनिल कपूर यांची छायाचित्रे...