आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या महिलेवर तयार झालेल्या चित्रपटाने कमावले 100 कोटी, स्वतः राहते अशा स्थितीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/बैतूल - अक्षय कुमारच्या 'टॉयलेट एक प्रेमकथा' चित्रपटाने जोरदार कमाई करत 100 कोटींचा टप्पा ओलांडला आहे. पण ज्या महिलेच्या रियल लाईफवर हा चित्रपट तयार करण्यात आला आहे, तिच्या जीवनात मात्र काहीही बदल झालेला नाही. अनिता आजही एका साध्या मोडकळीस आलेल्या घरात राहते. चित्रपटाचे यश आणि सेलिब्रेशन दरम्यान आम्ही तुम्हाला अनिताच्या घराचे इन-साइड फोटो दाखवणार आहोत. 

चित्रपटात दाखवलेले घर अनिताच्या घरापेक्षा अगदी वेगळे आहे. गावाबाहेर शेतात तयार करण्यात आलेले हे घर माती आणि दगडांपासून तयार केलेले आहे. रण अनिताचे टॉयलेट पूर्ण सिमेंटेड आहे. तीन खोल्यांच्या या घरात अनिता तिच्या दोन मुली आणि पतीसह राहते. अनिताचे किचनही दगड मातीचेच बनलेले आहे. पावसाळ्यात हे घर अनेक ठिकाणी गळते. 'टॉयलेट एक प्रेमकथा' मध्ये दाखवलेले घर मात्र पूर्णपणे वेगळे आहे. 

स्वतः चा फोटो पाहून झाले आश्चर्य 
- चित्रपट रिलीज झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी अनिता कुटुंबाबरोबर बैतूलमधील एका थिएटरमध्ये चित्रपट पाहायला गेली होती. 
- थिएटरचे संचालक विवेक मालवीय यांनी अनिता नर्रेचे स्वागत केले आणि तिच्या धाडसाचे कौतुकही केले. 
- चित्रपट पाहिल्यानंतर अनीता नर्रेने सांगितले की, चित्रपट खूप चांगले आहे. चित्रपट संपल्यानंतर जेव्हा आम्ही जागेवरून उठतच होतो तेव्हा मी माझा फोटो आणि त्याबरोबर माझी कथा दाखवत असल्याचे पाहिले. 
- मी स्वतःला एवढ्या मोठ्या स्क्रीनवर पाहताच, माझ्या अंगावर शहारे आले. नेमके काय घडते आहे, हे माझ्या लक्षातच आले नाही. 
- अशाप्रकारे मोठ्या पडद्यावर माझी कथा दाखवली जाईल, याची कल्पनाच नव्हती असे ती म्हणाली. 
 
स्वच्छ भारत मिशनमध्ये मिळाला पुरस्कार.. 
- फिल्म मेकर प्रवीण व्यास यांनी स्वच्छ भारत मिशनवर आधारित 2016 मध्ये एक डॉक्यु-फीचर बनवले होते. 
- जिसे पिछले साल के इंटरनेशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया में तीसरा पुरस्कार मिला था। 
- प्रवीण व्यास यांनी टॉयलेट: एक प्रेम कथाच्या निर्माते वायाकॉम 18 वर आरोप लावला होता की, त्यांनी प्रवीण यांच्या डॉक्यु-फिक्शनमधून काही सीन आणि डायलॉग हूबहू कॉपी केले आहेत. 
- त्यांनी फिल्मच्या प्रमोशनल कॅम्पेन आणि ट्रेलरच्या विरोधात लीगल नोटीसही पाठवली होती. 

काय आहे टॉयलेट एक प्रेम कथा.. 
- नारायण सिंह यांचा हा चित्रपट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 'स्वच्छ भारत अभियान' चा संदेश देणारा आहे. चित्रपटाचे शुटिंग होशंगाबादमध्येही झाली आहे. सत्यकथेवर आधारित असा हा चित्रपट आहे. 
- अनिता यांच्या सासर सोडण्याच्या पावलाचे सुलभ इंटरनॅशनलनेही कौतुक केले होते. नारायण सिंहने म्हटले होते की, प्रवीण व्यास यांच्या आरोपांचा प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. 
- व्यास यांचा दावा चुकीचा आहे. त्यांच्याकडे चित्रपटाचे लेखक 2013 मध्येच स्टोरी घेऊन आले होते. प्रवीण यांनी नंतर ही डॉक्टुमेंट्री तयार केली. 
- चित्रपटाला मिळत असलेल्या प्रतिसादाने ते आजारी आहेत. ही अनिता यांची रियल लाईफ स्टोरी आहे. 

अनीता ने मागितली होती रॉयल्टी
- चित्रपटाच्या रिलीजच्या पूर्वी अॅग्रिमेंटचा वाद समोर आला होता. 
- यासंबंधी डायरेक्टर आणि चित्रपटाची अॅक्ट्रेस भूमी पेडणेकर अनिता यांच्या गावात गेली होती. त्याठिकाणी त्यांनी अनिताला पाच लाख रुपये देऊन अॅग्रिमेंट साईन केल्याचे सांगितले होते. 
- त्याबाबत अनीताच्या पतीने नकार दिला होता. अनिता आणि तिच्या पतीने चित्रपटाची रॉयल्टीची मागणी केली होती. 
- त्यानंतर दोन दिवस समजावल्यानंतर अनिता आणि तिचा पती तयार झाला. 
- अॅक्ट्रेस भूमीने म्हटले होते की, अनिताला भेटून तिला फार आनंद झाला. 
 
पुढील स्लाइड्सवर पाहा फोटोज.. 
बातम्या आणखी आहेत...