आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'तेरा होने लगा हू\' गाण्यावर घातली वरमाला, सीरिअल शुटिंगसारखे झाले लग्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- एकता कपूरच्या टीव्ही सिरिअल सारखा शानदार सेट, लग्नाचा विशाल मंडप, बॉलिवूड थीमने भारलेले वातावरण, उत्साही नवरदेव-नवरी हे बघून कुणालाही वाटेल एखाद्या सिरिअलचे शुटिंग सुरु आहे. पण हा लग्नाचा सेट खराखुरा होता आणि लग्नही. टीव्ही अॅक्ट्रेस अंकिता चौधरी आणि तिचा बालपणाचा मित्र सौरभ उधानी यांनी लग्न केले. त्यासाठी अगदी सिलिअलच्या शुटिंगमध्ये उभारला जातो तसा सेट तयार करण्यात आला होता.
बॉलिवूड गाण्यावर घातली वरमाला
- ग्वाल्हेरच्या हॉटेल रिजन्सी स्क्वेअर गार्डनमध्ये झालेल्या लग्नात नवरदेव सौरभ राजेशाही बग्गीत बसून आला होता.
- सौरभच्या मित्रांनी वरातीत जोरदार डान्स केला. अंकिताच्या आईने मंडपाच्या द्वारावर येऊन स्वागत केले.
- काही वेळाने अंकिताने अगदी बॉलिवूड स्टाईलने मंडपात प्रवेश केला. अंकिताचा हात धरुन सौरभ स्टेशवर घेऊन गेला.
- त्यानंतर 'तेरा होने लगा हू' गाणे सुरु झाले. त्यानंतर सौरभ आणि अंकिता यांनी एकमेकांना हार घातले.
एकाच शाळेत होते दोघे
- टीव्ही सिरिअल जोधा-अकबरमध्ये काम केलेली ग्वाल्हेरची अंकिता चौधरी आणि सौरभ कोचिंग क्लासमध्ये आणि शाळेतही एकाच वर्गात होते.
- अंकिताने अनेक टीव्ही सिरिअल्समध्ये काम केले आहे. सौरभ मुंबईतील एका बॅंकेत मॅनेजर म्हणून काम करतो.
- सौरभ आणि अंकिता यांच्या कुटुंबीयांनीच हे लग्न पक्के केल्याचे सांगितले जात आहे.
- लग्न झाल्यानंतरही मी टीव्ही सिरिअल्समध्ये काम करणार असल्याचे अंकिताने सांगितले आहे.
पुढील स्लाईडवर बघा, सौरभ आणि अंकिता यांच्या लग्नाचे फोटो....
बातम्या आणखी आहेत...