आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ओम पुरींच्या पहिल्या पत्नीचे सख्खे भाऊ आहेत अनू कपूर, ओम पुरींसोबत नव्हते चांगले संबंध

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः  वेटरन अॅक्टर ओम पुरी यांचे 6 जानेवारी रोजी वयाच्या 66 व्या वर्षी प्राणज्योत मालवली. त्यांच्या आत्म्यास शांती लाभावी यासाठी त्यांची दोन्ही पत्नींनी वेगवेगळ्या प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. ओम पुरींची दुसरी पत्नी नंदिता पुरी यांनी जुहूस्थित ईस्कॉन टेंपलमध्ये प्रार्थना सभेचे आयोजन केले होते. तर त्यांची पहिली पत्नी सीमा कपूर यांनी एका गुरुद्वा-यात प्रार्थना सभा ठेवली होती. यावेळी सीमा कपूर यांच्यासोबत त्यांचे भाऊ अनू कपूर उपस्थित होते. अनू कपूर बॉलिवूडचे प्रसिद्ध अभिनेते आहेत. सीमा कपूर अनू कपूर यांची सख्खी बहीण आहे. 
 
प्रार्थना सभेनंतर मीडियाशी बोलताना अनू कपूर म्हणाले, हा अतिशय दुःखद क्षण  आहे. ओम  पुरी यांच्या मृत्यूविषयी ब-याच बातम्या समोर येत आहेत. पण ओम पुरी यांचा मृत्यू अनैसर्गिक असल्याचे म्हटलं जातंय, असा प्रश्न अनू यांना विचारला असता, ते म्हणाले, जेव्हा एखाद्या सेलिब्रिटीचा मृत्यू होतो, तेव्हा अनेक शंका वर्तवल्या जातात. पोलिस त्यांचे काम करत आहेत. 
अनू कपूर यांनी मिस्टर कबाडी नावाच्या सिनेमात ओम पुरी यांच्यासोबत काम केले आहे. हा सिनेमाविषयी अनू कपूर म्हणाले, की सीमा कपूर यांनीच सिनेमा दिग्दर्शित केला आहे. सध्या सिनेमाच्या एडिटिंगचे काम सुरु आहे. मी जेव्हाही ओम पुरींसोबतचे माझे सीन बघेल, तेव्हा वेळोवेळी त्यांचे स्मरण मला होईल.  
 
 
ओम पुरींचा तिरस्कार करायचे अनू कपूर 
अनू कपूर यांची बहीण सीमा कपूर यांच्यासोबत ओम पुरी यांचे पहिले लग्न झाले होते. मात्र वर्षभरही ते लग्न टिकले नव्हते. लग्नाच्या वर्षभरातच ओम पुरींनी सीमा कपूर यांना घटस्फोट देऊन जर्नलिस्ट असलेल्या नंदिता पुरीसोबत दुसरे लग्न थाटले होते. बहिणीचा संसार असा अर्ध्यावरच मोडल्याने अनू कपूर यांचे ओम पुरींसोबत कधीच संबंध चांगले नव्हते. काही वर्षांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनू कपूर यांनी ओम पुरींविषयीचे त्यांचे मत व्यक्त केले होते. त्या मुलाखतीत अनू कपूर काय म्हणाले होते, त्याचा सारांश आम्ही तुम्हाला येथे देतोय.  
 
इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अनू कपूर यांनी लग्नानंतर सीमा कपूर यांनी सहन केलेल्या वेदना सांगितल्या होत्या. ते म्हणाले होते, 'माझ्या बहिणीला होणारा त्रास बघून मी अतिशय दुःखी होतो. माझ्या बहिणीने वैवाहिक आयुष्यात दुःखाशिवाय दुसरे काहीच पाहिले नाही. निमुटपणे ती सगळा अत्याचार सहन करत राहिली. तिचे शोषण केले जात होते, मात्र ती सर्वकाही सहन करायची. कधीच तिने तिचे दुःख आम्हाला कळू दिले नाही. मात्र जेव्हा सहनशक्तीच्या पलीकडे सगळ्या गोष्टी गेल्या, तेव्हा तिने नव-यापासून घटस्फोट घेतला.'
 
या मुलाखतीत अनू कपूर म्हणाले होते, की उत्कृष्ट कलाकार असल्याचा अर्थ, ती व्यक्ती खासगी आयुष्यातही चांगली व्यक्ती असेल असे नाही. दोन्ही वेगवेगळे जग आहे. जर भविष्यात सीमा यांना ओम पुरींकडे परतायचे असेल, तर त्यावर तुमची प्रतिक्रिया काय असेल, असा प्रश्न अनू कपूर यांना विचारला असता, ते म्हणाले होते, की आमचा त्यावर आक्षेप नसेल. माझी बहीण समजूतदार असून बरे-वाईट तिला कळतं. मी नेहमीच तिच्या पाठीशी उभा राहिला. प्रत्येक पाऊलावर तिला साथ देईल.  
 
अनू कपूर म्हणाले होते, की ते ओम पुरींना खूप जवळून ओळखत नव्हते. मात्र त्यांचे थोरले बंधू ओम पुरींच्या अतिशय जवळ होते. पण जेव्हा बहीण सीमाने भोगलेले दुःख त्यांना समजले, तेव्हा मात्र ते ओम पुरींचा प्रचंड तिरस्कार करायला लागले होते.   
 
पुढे वाचा, ओम पुरींच्या दुस-या पत्नीने सीमा कपूर यांना ठेवले होते अंत्य विधीपासून  लांब...