आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सलमान विरोधात आणखी एक खटला दाखल, फ्लाइटमध्ये मारहाण केल्याचा आरोप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(फाइल फोटो- सलमान खान)
मुंबई- वारंवार वादात अडकणारा बॉलिवूड अभिनेता सलमान खानवर आणखी एक तक्रार दाखल झाली आहे. ही तक्रार चार महिन्यांपूर्वी झालेल्या घटनेमुळे दाखल करण्यात आली आहे. 4 नोव्हेंबर 2014 रोजी सलमान खान विमानाने प्रवास करत होता. त्याच्यासोबत रविंद्र व्दिवेदी नावाचा एक व्यक्तीसुध्दा प्रवास करत होता. रविंद्र आणि सलमान यांच्यात अचानक भांडण सुरु झाले.
त्यावेळी सलमानने आपल्या बॉडीगार्डला रविंद्रवर हमला करण्यास सांगितले होते, अशी माहिती आहे. एवढेच नव्हे, सलमानने बॉडीगार्डला रविंद्रच्या हातातून कागदपत्र हिसकावून घेण्यास सांगितले. कथितरित्या रविंद्रकडे दिवंगत नेते गोपिनाथ मुंडे यांच्या अपघाताचे कागदपत्रे होती.
या प्रकरणानंतर अंधेरी (मुंबई) मेट्रोपॉलिटन, कोर्ट नं 66ने तक्रार घेऊन एअरपोर्ट पोलिसांना या प्रकरणाचा तपास घेण्यास सांगितला आहे. कोर्टाच्या आदेशानुसार, एअरपोर्ट पोलिस IPC कलम 156 अंतर्गत या प्रकरणाची चौकशी करत आहे. ळ