आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Another Shocking Celeb Divorce: Malaika Arora Arbaaz Khan To Split?

मलायका-अरबाज यांच्यात दुरावा, अॅक्ट्रेसने घर सोडले; शोच्या फिनालेत दिसणार एकत्र

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - लग्नानंतर 17 वर्षांनी अभिनेता अरबाज खान आणि त्याची पत्नी मलायका अरोरा यांच्यात वितुष्ट आले आहे. दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. याआधीही अशा बातम्या आल्या होत्या. मात्र यावेळी मलायकाने खान फॅमिलीचा बंगला सोडला असल्याची माहिती आहे.

घटस्फोटाच्या बातम्यांना का मिळाली हवा
इंटरटेन्मेंट पोर्टल spotboye.com च्या वृत्तानुसार, मलायकाने काही दिवसांपूर्वीच खान कुटुंबाचा वांद्रे येथील बंगला सोडला आहे. ती खार येथील अपार्टमेंटमध्ये शिफ्ट झाली आहे. तिच्यासोबत तिचा 14 वर्षांचा मुलगा अरहान राहात आहे. मीडियातील वृत्तानुसार मलायका सध्या एका ब्रिटीश बिझनेसमॅनसोबत रिलेशनशिपमध्ये आहे.

वास्तविक मलायकाच्या व्यवस्थापकाने काही दिवसांपूर्वीच अरबाज आणि तिच्यात सर्व सुरळीत असल्याचे सांगितले होते. मात्र अरबाजची बहिन अर्पिताच्या डोहोळ जेवणाला मलायकाची अनुपस्थिती सर्वांना खटकली होती.

दोघे करत होते शो होस्ट
- मलायका आणि अरबाज यांची 17 वर्षांपासूनची बाऊंडींग पाहून पॉवर कपल शो निर्मात्यांनी त्यांना शो होस्टची ऑफर दिली होती.
- मलायका आणि अरबाज कित्येक दिवसांपासून पॉवर कपल शो होस्ट करत होते.
- मात्र काही दिवसांपासून मलायका या शो मध्ये दिसत नाही. अरबाज एकटाच शो होस्ट करताना दिसत होता.
- सेटवरील सूत्रांच्या माहितीनुसार, डिसेंबरच्या सुरुवातीला दोन्ही कलाकारांनी त्यांच्यासाठी वेगवेगळ्या रुमची मागणी केली होती. ते सेटवरही फार बोलताना दिसत नव्हते.
- ब्रेकनंतर दोघेही आपापल्या रुममध्ये जाऊन बसत होते, ते एकत्र फार कमी दिसत होते.
- दरम्यान, अशी माहिती आहे की चॅनलच्या विनंतीवरुन दोघे शोच्या फायनलमध्ये एकत्र दिसणार आहेत. त्याचे शुटिंग गोव्यातील एका व्हिलामध्ये लवकरच होणार आहे.

केव्हा झाले होते लग्न
- अरबाज आणि मलायका यांचे लग्न 1998 च्या डिसेंबरमध्ये झाले होते.
- लग्नाआधी दोघे जवळपास पाच वर्षे डेटिंग करत होते.
- मलायका अरबाज पेक्षा सहा वर्षे लहान आहे.

अरबाजचे करियर
- 4 ऑगस्ट 1967 ला जन्मलेल्या अरबाजने अभिनेता म्हणून करियरची सुरुवात 1996 मध्ये 'दरार' चित्रपटातून केली. या चित्रपटासाठी त्याला फिल्मफेअरचा बेस्ट व्हिलन अवॉर्ड मिळाला होता.
- 'प्यार किया तो डरना क्या', 'गर्व', 'कयामत', 'हलचल', 'मालामाल वीकली', 'भागम भाग', 'फॅशन', 'दबंग', 'दबंग-2' सारख्या चित्रपटातून अरबाज झळकला आहे.
- अरबाज आता अॅक्टिंगपेक्षा डायरेक्शनवर फोकस करत आहे. त्याच्या दिग्दर्शनात तयार झालेला पहिला चित्रपट आहे 'दबंग- 2'.

मलायकाचे करियर
- मलायकाने मॉडेल म्हणून करियरची सुरुवात केली.
- 1999 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'दिल से' चित्रपटातील 'छैया.. छैया' गाण्यातून झळकलेली मलायका सर्वांच्या लक्षात राहिली.
- तिने अनेक चित्रपटात आयटम नंबर्स केले आणि कॅमियो रोल्स देखिल.
- टीव्हीवरील अनेक डान्स रियालिटी शोमध्येही जज म्हणून मलायका दिसली.
फरहान- अधुनाच्या 15 वर्षांच्या नात्याला ब्रेक
याच महिन्यात अभिनेता फरहान अख्तर पत्नी अधुनापासून विभक्त झाला. यांचे लग्न 2000 मध्ये झाले होते. फरहानने त्याचे घर सोडले असून तो बहिन जोयाच्या घरी राहायला गेला आहे. लवकरच तो मुंबईत स्वतःचे घर घेणार असल्याची माहिती आहे.
वेगळे झाल्यानंतर दोघांनी एकत्रितरित्या प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले, 'मी (फरहान) आणि अधुना दोघेही एकमेकांच्या संमंतीने वेगळे होत आहोत. आमची मुले आमची जबाबदारी आहे. दोघेही त्यांचा सांभाळ करु. त्यांना विनाकारण या वादात ओढणे योग्य नसल्याचे मला वाटते. या काळात आम्हाला थोडा स्वतःबद्दल विचार करु द्यावा.'
पुढील स्लाइडमध्ये, मलायका- अरबाजची लव्हस्टोरी...