आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'उडता पंजाब\'वर बोलला अनुराग, \'असे वाटते, आपण भारतात नव्हे नॉर्थ कोरियात राहतो\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई: ‘उडता पंजाब’ सिनेमाबाबत सुरु असलेले वाद थांबायचे नाव घेत नाहीये. सेन्सॉर बोर्डाने सिनेमाच्या टायटलमध्ये बदल करण्यास सांगितल्याच्या प्रकरणात निर्माता अनुराग कश्यपने भारताची तुलना नॉर्थ कोरियासोबत केली. अनुरागने टि्वट करून सांगितले, 'मी विचार करायचो, की नॉर्थ कोरियामध्ये राहिल्यास कसे वाटते. आता तर तिथे जाण्याची गरजच नाहीये.' अनुरागने हे टि्वट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनासुध्दा टॅग केले आहे. सेन्सॉर बोर्डाने 'पंजाब' शब्दाविषयी आक्षेप घेतला आहे. त्यानंतर सिनेमात बदल होऊ शकतो.
गुरुवारी या प्रकरणाची सुनावणी
- फिल्मचे टायटल आणि सब्जेक्टमधून पंजाब नाव काढावे व चित्रपटातील 89 दृष्यांना सेन्सॉर बोर्डाने कात्री लावावी, अशी अट घातल्यानंतर निर्माता अनुराग कश्यप यांनी आता उच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
- याबाबत सेन्‍सॉर बोर्डाचे अध्‍यक्ष पहलाज निहलानी म्‍हणाले की, '' आमच्‍यावर कोणताही राजकीय दबाव नाही. जो कोणी पूर्ण चित्रपट पाहिल त्‍याला कारण माहित पडेल.
- 'उड़ता पंजाब'च्‍या निर्मात्‍यांनी बुधवारी मुंबई उच्‍च न्‍यायालयात धाव घेतली. गुरुवारी
या प्रकरणाची सुनावणी होईल.
काय आहे वाद...
- कश्यपच्या सांगण्यानुसार, 'उडता पंजाब'पेक्षा जास्त प्रामाणिक दुसरा सिनेमा नाही. याचा विरोध करणारा पक्ष किंवा व्यक्ती ड्रग्सला पाठिंबा देण्याचे दोषी आहेत.
- दिग्दर्शक अभिषेक चौबेच्या या सिनेमातून फिल्म सर्टिफिकेशन ट्रिब्यूनल ने (एफसीएटी) 'पंजाब' शब्द काढून टाकण्यास सांगितला आहे.
- काही दिवसांपूर्वी ट्रिब्यूनलने सिनेमाला सर्टिफिकेट न देता रेव्हिसिंग कमिटीमध्ये पाठवला होता. आता बातमी आहे, की निर्मात्यांना सिनेमातून 'पंजाब' शब्द काढून टाकण्याचा सल्ला दिला आहे.
- इतकेच नव्हे तर सिनेमातून पंजाबमधील ड्रग्स रॅकेटच्या रेफरेन्सलासुध्दा काढण्याची मागणी केली आहे.
- एफसीएटीनुसार, सिनेमात काही असेही सीन आहेत, ज्यामुळे पंजाबची प्रतिमा मलिन होत आहे.
- सिनेमात पंजाबमधील तरुणांना ड्रग्सच्या व्यसनाचा मुद्दा उचलला आहे.
- 'उडता पंजाब'मध्ये शाहिद कपूर, करीना कपूर खान, आलिया भट आणि दिलजीत दोसांझने मुख्य भूमिका साकारल्या आहेत. सिनेमा 17 जूनला रिलीज होणार आहे.
सिनेमाविषयी राजकारण का?
- पंजाबमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणूका होणार आहेत. पंजाबमध्ये भाजप-अकाली दलाचे सरकार आहे.
- काँग्रेस आणि आम आदमी पार्टी मुख्यमंत्री काश सिंह बादल यांच्यावर राज्यात वाढणा-या ड्रग व्यवसायामुळे टिका करत असतात.
- त्यामुळे सेन्सॉर बोर्डाला भिती आहे, की 'उडता पंजाब' सिनेमाच्या माध्यमातून राजकिय पक्ष निवडणूकिमध्ये याचा फायदा घेऊ शकतात.
- बोर्डाचे अध्यक्ष भाजपचे परिचयाचे आहेत. ते मोदींची शॉर्ट फिल्म बनवून वादात अडकले आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अनुराग आणि अशोक पंडित यांचे ट्वीट आणि 'उडता पंजाब'चे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...