मुंबई- अभिनेत्री अनुष्का शर्माने एका प्रसिध्द ब्रँडचे हेअर प्रॉडक्ट लाँच केले आहे. यानिमित्त अनुष्काने DIORचे ऑफ व्हाइट स्विंग ड्रेस परिधान केलेला होता. आपल्या लूकला तिने Louboutinsने पूर्ण केले आहे.
दोन दिवसांपूर्वी माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांना सोशल साइटवर अनुष्काने श्रध्दांजली वाहीली होती. टि्वटमध्ये अनुष्काने डॉ. ए. पी. जे कलाम यांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला होता. त्यानंतर तिला सोशल साइटवर टार्गेट करण्यात आले. यूझर्सने तिचा चांगलीच खिल्ली उडवली. मीडियाने जेव्हा याविषयी अनुष्काला विचारले तेव्हा ती म्हणाली, \'प्रत्येक माणसाकडून चूक होते. माझा हेतू योग्य होता. ही गोष्ट खिल्ली उडवणा-यांना समजली नाही. मला माहित आहे, मी कोणत्या विचाराने ती पोस्ट लिहिली होती. टि्वटरवर अनेकदा माझी खिल्ली उडाली आहे. मी फेक आयडी आणि फेक अटाऊंटवरून कमेंट्स करणा-या लोकांवर लक्ष द्यायते नाहीये. हिम्मत असेल तर समोर येऊन बोला, तेव्हा पाहिल.\'
सोमवारी (27 जुलै) रात्री अनुष्काने कलामांच्या नावाचा चुकीचा उल्लेख केला. तेव्हापासून तिच्यावर सतत टिका होतेय.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या इव्हेंटमधील अनुष्काची काही छायाचित्रे...