आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काच्या 'साखरपुड्या'नंतर हिचीसुध्दा झाली एंगेजमेंट, पाहा कुठे झाला सोहळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शु्क्रवारी 'फिलौरी'च्या शूटिंगदरम्यान को-स्टार मेहरीन कौरने (ग्रीन ड्रेसमध्ये) साखपुड्याचा  सीन शूट केला. - Divya Marathi
शु्क्रवारी 'फिलौरी'च्या शूटिंगदरम्यान को-स्टार मेहरीन कौरने (ग्रीन ड्रेसमध्ये) साखपुड्याचा सीन शूट केला.
पटियाला (पंजाब): 'फिलौरी'च्या शूटिंगमध्ये मागील दिवसांत अभिनेत्री अनुष्का शर्माच्या साखरपुड्याचा सोहळा झाला. आता सिनेमातील को-स्टार मेहरीन कौरचासुध्दा साखरपुड्याचा सोहळा पार पडला. यादरम्यान अनुष्का गोल्डन लहंगामध्ये दिसली. सिनेमाचे शूटिंग पंजाबच्या पटियालाच्या एका हॉटेलमध्ये चालू आहे. सिनेमात अनुष्का शर्मा भूताची भूमिका करत आहे. त्यात ती केवळ हिरोलाच (सूरज शर्मा) दिसते.
‘NH10’नंतर दूसरा होम प्रॉडक्शन सिनेमा...
- फॉक्स स्टार स्टुडिओच्या बॅनरखाली तयार होत असलेला 'फिलौरी' स्वत: अनुष्का आणि तिचा भाऊ कर्णेश निर्मित करत आहेत.
- या सिनेमात अनुष्का, पंजाबी स्टार दिलजीत दोसांझ आणि ‘लाइफ आफ पाई’चा स्टार सूरज शर्मा मुख्य भूमिकेत आहेत.
- ‘NH10’ या डार्क थ्रिलरनंतर अनुष्काचा हा दुसरा होम प्रॉडक्शन सिनेमा आहे.
अनुष्काने परिधान केला गोल्डन लहंगा...
- 29 मे रोजी झालेल्या शूटमध्ये अनुष्काने अभिनेता सूरज शर्मासोबत साखरपुडा केला.
- गोल्डन लहंग्यात अनुष्का रॉयल लूक दिसला होता. सूरजसुध्दा ब्लू शेरवानी परिधान करून पटियाला रॉयल लूकमध्ये दिसून आला होता.
- या सिनेमात पटियालाचा आर्टिस्ट हॉबी धालीवालसुध्दा काम करत आहे.
लव्हस्टोरीवर आधारित आहे सिनेमा...
- लव्हस्टोरी आणि पंजाब मॅरेजवर आधारित या सिनेमाचे दिग्दर्शन अनशई लाल करत आहे.
- या सिनेमाविषयी अनुष्का सांगते, 'फिलौरी एक अद्भूत कथा आहे. ती पूर्ण करण्यासाठी 100 वर्षे लागली.'
- सिनेमात खूप ह्यूमर, मसाला आणि वेडिंग फनसोबतच मनोरंजन आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा 'फिलौरी'च्या शूटिंगचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...