आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनुष्काने शेअर केला नव्या चित्रपटातील लुक, हॉरर फिल्म असल्याची चर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - अभिनेत्री अनुष्का शर्माने तिचा आगामी चित्रपट परी चित्रपटाचा फर्स्ट लुक शेअर केला आहे. शेअर केलेल्या फोटोमध्ये ती फारच भीतीदायक दिसून येत आहे. त्यामुळे हा हॉरर चित्रपट असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 
 
या चित्रपटाची निर्मिती अनुष्का शर्माच्या क्लिन स्लेट फिल्म्सद्वारे करण्यात आली आहे. एनएच10 आणि फिल्लौरी या चित्रपटानंतर अनुष्काची निर्मिती असलेला हा तिसरा चित्रपट आहे. 
 
अनुष्का शर्माने एका मुलाखतीत सांगितले होते की क्लीन स्लेट फिल्म्सद्वारे ती नेहमी असे चित्रपट लोकांसमोर आणू इच्छिते जे केवळ दर्जेदार कथा आणत नाहीत तर अनेकविध प्रयोग करुन प्रेक्षकांचे मनोरंजन करतील. 
 
क्लीन स्लेट फिल्म्स चा सहनिर्माता अनुष्काचा भाऊ कर्णेश शर्मा आहे.
बातम्या आणखी आहेत...