आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Anushka Sharma Ranveer Singh\'s Plotline From \'Dil Dhadakne Do\' Revealed!

Plotline Revealed: विखुरलेल्या कुटुंबाची कहाणी आहे \'दिल धडकने दो\'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शिका झोया अख्तरचा आगामी सिनेमा म्हणजे 'दिल धडकने दो'. या सिनेमातील अनिल कपूर, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा यांचा लूक रिव्हिल करण्यात आला आहे.
'दिल धडकने दो' या सिनेमाचा ट्रेलरसुद्धा लवकरच रिलीज करण्यात येणार आहे. आता या सिनेमातील रणवीर आणि अनुष्का शर्मा यांच्या पात्रांचा खुलासा झाला आहे. या सिनेमाची कथा ही विखुरलेल्या कुटुंबाची आहे.
या श्रीमंत कुटुंबात अनिल कपूर, शेफाली शाह, रणवीर सिंह आणि प्रियांका चोप्रा हे चार सदस्य आहेत. वैचारिक मतभेदांमुळे छोट्या छोट्या गोष्टींवरुन त्यांच्यात भांडण होतात. आपापसांतील मतभेद दूर करण्यासाठी हे चौघे एका क्रूजवर जातात.
रणवीरने श्रीमंत वडिलांच्या मुलाची भूमिका साकारली आहे. कबीर हे त्याच्या पात्राचे नाव असून तो चांदीचा चम्मच घेऊनच जन्माला आला आहे. त्याला विमानांचे आकर्षण असून पायलट बनण्याची त्याची इच्छा असते. अनुष्काने फराह नावाच्या महत्त्वकांक्षी तरुणीची भूमिका साकारली आहे. डान्सर बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून ती घरुन पळून जाते.
क्रूजवर रणवीर आणि अनुष्काची भेट होते. हळूहळू दोघे एकमेकांच्या प्रेमात पडतात. कबीरचे त्यांच्या वडिलांशी (अनिल कपूर) यांच्याशी चांगले संबंध नाहीयेत. वडिलांच्या मते, कबीरने आपल्या कुटुंबाचा व्यवसाय सांभाळायला हवा. मात्र त्याला स्वतःची स्वप्ने पूर्ण करायची आहेत.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा 'दिल धडकने दो' या सिनेमाशी निगडीत खास छायाचित्रे...