आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: गर्लफ्रेंड अनुष्का शर्मासोबत विराटने पाहिला \'सुल्‍तान\'

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- चाहत्‍यांना प्रतिक्षा असलेल्‍या सलमान खानचा ‘सुल्तान’ चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खानच्‍या अपोजिट अनुष्का शर्माची भूमिका आहे. खास बातमी ही आहे की, अनुष्काने तिचा बॉयफ्रेंड किक्रेटर विराट कोहली याच्‍यासोबत स्पेशल स्क्रिनिंग ठेवली होती. दोघेही एकाच कारमधून सिनेमा पाहण्‍यासाठी पोहोचले होते.

अनुष्‍का कुस्‍तीपटू..
सुल्‍तान चित्रपटासाठी सुरुवातीला चित्रपटाची नायिकाच सापडत नव्हती. ‘यशराज प्रॉडक्शन’ असूनही मोठमोठय़ा नायिकांची नावे समोर येत होती. तितक्याच वेगाने पुसली जात होती. अखेर अनुष्का शर्माच्या नावावर मोहोर लागली तेव्हा सगळ्यांनाच आश्चर्य वाटल्याशिवाय राहिले नाही. अनुष्‍काने एका महिला कुस्तीपटूची भूमिका या चित्रपटात रंगवली आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एका महिला कुस्तीपटूची कथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. अनुष्काने त्‍यासाठी फार मेहनत घेतल्‍याचे दिसते.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, अनुष्‍का आणि विराटचे फोटो..
(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...