दिग्दर्शक शंकर यांच्या गाजलेल्या 'रोबोट' या सिनेमाच्या सिक्वेलमध्ये सुपरस्टार रजनीकांतसोबत हॉलिवूडचा मेगास्टार अर्नोल्ड श्वार्जनेगर झळकणार आहे. भारतीय चित्रपट इतिहासात पहिल्यांदाच हा योग जुळून आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्वी रजनीकांत आणि ह्रतिक रोशन मिळून हा 'रोबोट 2' करणार होते. पण आता ह्रतिकऐवजी अर्नोल्ड रजनीकांतसोबत काम करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे..
विशेष म्हणजे, काही दिवसांपूर्वी जेव्हा हॉलिवूडचा मेगास्टार अर्नोल्ड भारतभेटीवर आला होता, तेव्हा त्याने रजनीकांतसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्याची ही इच्छा लवकरच पूर्ण झाली असून दोन मेगास्टार्सना एकत्र मोठ्या पडद्यावर बघण्याची संधी त्यांच्या चाहत्यांना मिळणार आहे.
पुढे वाचा, 'रोबोट 2'मधून ऐश्वर्या राय बच्चन आउट एमी जॅक्सन इन...