आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रामगोपाल वर्मांविरोधात अटक वॉरंट, \'अज्ञात\' सिनेमाची कथा चोरल्‍याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-   दिग्‍दर्शक रामगोपाल वर्मा आणि निर्माते रॉनी स्‍क्रूवाला यांच्‍याविरोधात औरंगाबाद खंडपीठाने अजामीनपात्र अटक वॉरंट जारी केले आहे. सिनेमाची कथा चोरल्‍याचा आरोप दोघांवर ठेवण्‍यात आला आहे.
 
रामगोपाल वर्मा यांचा 2009 साली 'अज्ञात' हा सिनेमा रिलिज झाला होता. मात्र त्‍याची कथा रामगोपाल वर्मा यांनी आपल्‍याकडून चोरली असल्‍याचा दावा औरंगाबादेतील मुस्‍ताक मोहसिन यांनी केला होता. याविरोधात त्‍यांनी न्‍यायालयात धाव घेतली होती. यावर न्‍यायालयाने रामगोपाल वर्मांसह चित्रपटाचे निर्माते रॉनी स्क्रूवाला यांच्याविरोधात आज अटक वॉरंट जारी केले.
 
याविषयी माहिती देताना मोहसिन यांनी सांगितले की, ' मी चित्रपटाची कथा राम गोपाल वर्मा यांना पाठवली होती. मात्र यावर त्‍यांचे काहीच उत्‍तर आले नाही. काही दिवसांनी मी 'अज्ञात' सिनेमा पाहिला. तेव्‍हा संपूर्ण सिनेमा माझ्याच कथेवर बनवल्‍याचे मला आढळले. मात्र त्‍याचे श्रेय मला न देता ते वर्मा यांनी नीलेश गिरकर आणि पुनीत गांधी यांना दिले होते. त्‍यामुळेच मी त्‍यांना कायदेशीर नोटीस पाठवली.'
बातम्या आणखी आहेत...