Home »News» Arshad Warsi Birthday Special News

B'day : जेव्हा कॉलेजमध्ये जज बनून गेलेल्या अर्शदचा विद्यार्थीनीवर जडला जीव

दिव्य मराठी वेब टीम | Apr 19, 2017, 00:00 AM IST

बॉलिवूड अभिनेता अर्शद वारसी 49 वर्षांचा झाला आहे. 19 एप्रिल 1968 रोजी मुंबईमध्ये जन्मलेल्या अर्शदने 1996मध्ये अमिताभ बच्चन प्रॉडक्शन हाऊस अमिताभ बच्चन कॉर्पोरेशन बॅनर अंतर्गत बनलेल्या 'तेरे मेरे सपने' सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली. यापूर्वी 1987मध्ये तो महेश भट्ट यांचा सहायक दिग्दर्शक म्हणून काम करत होता. त्याने महेश यांच्या 'ठिकाना' आणि 'काश' सिनेमासाठी सहायक दिग्दर्शक म्हणून काम केले होते. त्यानंतर अर्शदला सहायक भूमिकांसाठी ओळख मिळाली. अर्शदचा विद्यार्थीनीवर जडला जीव...
1991ची गोष्ट आहे. अर्शद त्यावेळी एक डान्स ग्रुप चालवत होता. अर्शदला मुंबईच्या सेंट झेव्हियर कॉलेजमध्ये आयोजित मल्हार फेस्टिव्हलमध्ये जज म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. तिथे त्याने सेंट एंड्र्यू कॉलेजमधील स्मित हास्य देणा-या एका सुंदर तरुणीला पाहिले. त्या तरुणीचे नाव मारिया गोरेटीको होते. ती या स्पर्धेत भाग घेण्यासाठी आली होती. अर्शदला पहिल्याच नजरेत तिच्यावर प्रेम झाले.
नाही नाही म्हणता मारियाने दिला होकार...
पहिल्या नजतेच प्रेम झाल्यानंतर अर्शदने मारियाला आपल्या डान्स ग्रुपमध्ये सामील करण्याचा प्रस्ताव दिला. अशाप्रकारे मारिया आर्शदला असिस्ट करू लागली. दोघांची रोज भेट होऊ लागली. अर्शदच्या सांगण्यानुसार, 'माझे मित्र मला नेहमी म्हणायचे, मारिया तुझ्यावर प्रेम करते. परंतु जेव्हा मी मारियाला विचारायचो तेव्हा ती नाही म्हणायची.' तिला अर्शद आवडत होता, परंतु ती त्याचा स्वीकार करत नव्हती. अर्शद एका मुलाखतीत म्हणाला होता, 'आम्ही दोघे दुबई टूर गेलो होतो. तेव्हा मी मारियाला कोल्ड ड्रिंकमध्ये बिअर पाजली होती. मारियाने नशेत माझ्या प्रेमाचा स्वीकार केला.'

व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी झाले लग्न...
अर्शदसोबत लग्न करण्यासाठी मारियाचे आई-वडील तयार नव्हते. त्यांना वाटायचे, की सिनेसृष्टीतील लोकांचे लग्न टिकत नाही. परंतु अर्शदला भेटल्यानंतर लग्न चर्चमध्ये होणार या अटीवर लग्नाला होकार दिला. अर्शदच्या कुटुंबीयांना मुस्लिम पद्धतीने लग्न करायचे होते. त्यावेळी अर्शद-मारियाने ठरवले, की 14 फेब्रुवारी 1999ला म्हणजेच व्हॅलेंटाइन डेच्या दिवशी लग्न करायचे. या दिवशी त्यांनी मुस्लिम आणि ईसाई दोन्ही पद्धतीने लग्न केले. वयाच्या 20व्या वर्षी आई-वडिलांना गमावलेल्या अर्शदसाठी मारिया सर्वात मोठा पाठिंबा होती.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अर्शद-मारियाचे रोमँटिक PHOTOS...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)

Next Article

Recommended