आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

12 मजले चढून आशा पारेख आल्‍या होत्‍या पद्म भूषण मागण्‍यासाठी, गडकरींचा दावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आशा पारेख - Divya Marathi
आशा पारेख
नवी दिल्ली - 'मला पद्म भूषण पुरस्‍कार द्यावा, अशी स्‍वत:च स्‍वत:ची शिफारस करण्‍यासाठी 12 मजले चढून बॉलिवुड अभिनेत्री आशा पारेख या माझ्याकडे आल्‍या होत्‍या', असा गौप्‍यस्‍फोट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी एका कार्यक्रमात केला. विशेष म्‍हणजे पारेख यांचा पद्मश्री पुरस्‍काराने गौरव झालेला आहे.
गडकरी पुढे म्‍हणाले, पद्म भूषण पुरस्‍कारासाठी जी स्‍पर्धा केली जात आहे ती योग्‍य नाही. पुरस्‍कारासाठी माझ्याकडे वशिला लावायला अनेक जण येतात. त्‍यामुळे मी त्रस्‍त झालोय. याचसाठी जेव्‍हा आशा पारेख आल्‍या होत्‍या तेव्‍हा माझ्या घराची लिफ्ट बिघडलेली होती. परंतु, त्‍या तब्‍बल 12 मजले चढून माझ्यापर्यंत आल्‍या. आपला यापूर्वी पद्मश्री मिळलेला आहे. त्‍यामुळे आपण पद्म भूषणसाठी पात्र असून, आता तो पुरस्‍कार द्यावा असे त्‍या म्‍हणाल्‍याचे गडकरींनी सांगितले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, आशा पारेख यांनी काय स्‍पष्‍टीकरण दिले...