आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिल्ममेकरवर प्रेम करायच्या आशा पारेख, या भितीमुळे केले नाही लग्न...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अॅक्ट्रेस आशा पारेखची ऑटोबोयोग्राफी 'द हिट गर्ल' लॉन्च झाली आहे. आशाने ऑटोबायोग्राफी ही जर्नलिस्ट खालिद मोहम्मदसोबत मिळून लिहिली आहे. ज्यामध्ये त्यांनी फिल्म मेकर नासिर हुसैनसोबतच्या आपल्या नात्याविषयी मोकळेपणाने लिहिले आहे. बुक लॉन्चिंग निमित्ताने आशा पारेख यांनी आम्हाला आपल्या पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफविषयी मोकळेपणाने बातचीत केली. आम्ही आज प्रकाशित करत आहोत केलेल्या बातचीतमधील महत्त्वाचे मुद्दे...
 
- एकेकाळी नासिर हुसैनच्या प्रेमात होत्या आशा, यामुळे केले नाही लग्न
फिल्म मेकर नासिर हुसैनसोबत आशा ने  'दिल देके देखो', 'तीसरी मंजिल' आणि 'कारवां' सोबतच 7 फिल्ममध्ये काम केले. आशा सांगतात की, नासिर साहेब एकच असे पुरुष होते, ज्यांच्यावर मी प्रेम केले. माझ्या जीवनात जे लोक महत्त्वाचे आहे, त्यांच्याविषयी मी बोलले नाही तर आत्मकथा लिहिण्याला काहीच अर्थ नाही. मी कधीच घर मोडणारी बनले नाही. माझ्या आणि नासिर साहेबांच्या घरच्यांमध्ये कधीच वाद झाला नाही. मला नासिर यांना कधीच त्यांच्या कुटूंबापासून वेगळे करायचे नव्हते म्हणून मी त्यांच्यासोबत लग्न केले नाही. माझ्या जीवनातील या नाजूक प्रसंगाची योग्य मांडणी करण्याचे श्रेय मी आत्मकथेचे सह-लेखक खालिद मोहम्मदला देते. पुस्तक लॉन्चिंगच्या वेळी नुसरत(हुसैनची मुलगी) आणि इमरान खान(नातू) यांना पाहून मला खुप आनंद झाला. मला वाटते की, मी माझे जीवन प्रतिष्ठेने आणि कोणालाच त्रास न देता जगले. 

- लग्न न करण्याचे कारण
"मला वाटते की, लग्न देवच ठरवत असतो. कदाचित या बाबतीत देव माझी जोडी बनवणे विसरला. माझ्या लग्नाचा योग नव्हता, म्हणून माझे लग्न झाले नाही. माझ्या आईला वाटत होते की, कोणत्याही प्रकारे माझे लग्न व्हावे. त्यावेळी तिने प्रयत्न केले परंतु असे झाले नाही. मला असे वाटायचे की, लग्न होण्यापेक्षा चांगले लग्न होणे महत्त्वाचे आहे. फक्त लग्नाचा टॅग लावण्यासाठी मला लग्न करायचे नव्हते. माझी इच्छा होती की, ज्यावेळी मला माझ्या आवडीचा जोडीदार मिळेल तेव्हाच मी लग्न करावे. असे झाले नाही यामुळे मी लग्न केले नाही."
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा आशा पारेखचा संपुर्ण इंटरव्यू...
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)


 
बातम्या आणखी आहेत...