आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पठाणकोट : विनोदवीर कपिल शर्माच्या भावाने सांभाळला होता मोर्चा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कपिल शर्मा, त्याची आई आणि भाऊ अशोक. (फाइल फोटो) - Divya Marathi
कपिल शर्मा, त्याची आई आणि भाऊ अशोक. (फाइल फोटो)

पठाणकोट/नवी दिल्लीः पठाणकोट हल्ल्याच्या वेळी एअरबेसच्या बाहेर पंजाब पोलिसांचे जवान तैनात होते. त्यापैकीच एक होते विनोदवीर कपिल शर्माचे थोरले भाऊ अशोक शर्मा. ते एके- 47 घेऊन तैनात होते. गेल्या आठवड्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सात जवान शहीद झाले तर सहा दहशतवाद्यांना भारतीय जवानांनी कंठस्नान घातले.
का झाली होती कपिलच्या भावाची नियुक्ती...
- अशोक शर्मा विनोदवीर कपिलचे थोरले भाऊ असून त्याच्यापेक्षा वयाने दोन वर्षे मोठे आहेत. ते अमृतसरच्या रुरल पोलिसमध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत.
- 2 जानेवारी रोजी ते आपल्या जिल्ह्याच्या 80 पोलिस जवानांसोबत पठाणकोट येथे पोहोचले होते.
- ते चाकी नदीच्या जवळ असलेल्या एअरबेसच्या एन्ट्री आउट पोझिशनवर होते.
- आत शिरलेले दहशतवादी पळून जाऊ नये, त्यासाठी पोलिस जवानांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती.
- याशिवाय एनएसजी आणि एअरफोर्सचे क्विक रिअॅक्शन टीमचे गार्ड्ससुद्धा दहशतवाद्यांशी मुकाबला करत होते.
तीन दिवस राहिली 20 तासांची शिफ्ट
- अशोक यांनी सांगितले, "पहिले तीन दिवस आम्ही 20 तासांची शिफ्ट केली. जेव्हा आम्ही आमच्या टेम्पररी शेल्टरमध्ये पोहोचले, तेव्हा तिथे आम्हाला चहा आणि बिस्किट मिळाले. मी काही वेळ झोपलो आणि नंतर पुन्हा स्पॉटवर दाखल झालो."
- ''जेव्हा गोळीबार सुरु होता , तेव्हा आर्मीचे जवान कशापद्धतीने बेसच्या आत जात होते, ते आम्ही पाहिले. ती अतिशय अडचणीची वेल होती.''
पंजाब पोलिसांची खिल्ली उडल्याविषयी काय म्हणाले अशोक?
- ''माझे थोडे वजन वाढले आहे, मात्र एवढेसुद्धा नाही, ज्याप्रकारे कपिल आपल्या शोमध्ये पंजाब पोलिसांना प्रेझेंट करतो.''
- कपिलचे वडील जितेंद्र कुमार हे सुद्धा पोलिसात होते. पंजाब पोलिसमध्ये सब इन्स्पेक्टर राहिलेले जितेंद्र यांचे 2004 साली कॅन्सरमुळे निधन झाले होते.
फोटो काढण्यासाठी अशोक यांनी दिला नकार
- अशोक शर्मा ग्लॅमरच्या दुनियेपासून दूर राहतात. ऑपरेशन संपल्यानंतर जेव्हा मीडिया त्यांच्याकडे त्यांचे फोटो काढण्यासाठी पोहोचला, तेव्हा त्यांनी यासाठी नकार दिला.
- 35 वर्षीय अशोक म्हणतात, "मला अनेकदा टीव्ही सेटवर जाण्याची संधी मिळाली आहे. अमिताभ बच्चन, ऋषी कपूर, सलमान खानसह अनेक स्टार्ससोबत माझी भेट झाली आहे."
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, फोटोज...
बातम्या आणखी आहेत...