आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिग्दर्शक अशोक कुमारची गळफास घेऊन आत्महत्या, सुसाइड नोटमध्ये सांगितले मृत्यूचे कारण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तमिळ चित्रपट निर्माते-दिग्दर्शक बी अशोक कुमार यांनी चेन्नईतील अलवरथिरुनगर येथील राहत्या घरी आत्महत्या केली. मदुराई येथील भांडवलदाराने धमकावल्यामुळे आपण हे पाऊल उचलत असल्याचे त्यांनी सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. जवळपास सात वर्षांपेक्षा अधिक काळ त्या भांडवलदाराच्या संपर्कात राहण्याचा आपला निर्णय चुकीचा होता, असेही त्यांनी या नोटमध्ये म्हटले आहे.

 

बी अशोक कुमार यांनी भांडवलदाराकडून बरेच पैसे उधार घेतले होते. गेल्या काही वर्षांपासून ते उधारी परत करण्याचा प्रयत्न करत होते. पण, त्या भांडवलदाराने त्यांच्यावर पैशांच्या मुद्द्यावरुन दबाव टाकण्यास सुरू केल्याने अखेर त्यांनी आत्महत्येचे पाऊल उचलल्याचे म्हटले जात आहे.

 

सध्या, स्थानिक पोलिसांनी अशोक यांचा मृतदेह नजीकच्या रुग्णालयात नेला असून, या प्रकरणाचा तपास सुरु आहे. अशोक यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केल्यानुसार या साऱ्यामध्ये तो भांडवलदार दोषी आढळल्यास त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे म्हटले जात आहे.अशोक कुमार हे प्रसिद्ध अभिनेता, दिग्दर्शक शशी कुमार यांचे नातेवाईक असल्याचे कळत आहे. 

 

‘ईसान’ आणि ‘पोराली’ या चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते. तर येत्या काही दिवसांमध्ये ‘कोडी वीरन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याचे कळत आहे.

 

पुढे वाचा, दिग्दर्शक बी अशोर कुमार यांच्या सपोर्टमध्ये करण्यात आलेले ट्वीट्स... 

बातम्या आणखी आहेत...