आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रिसेप्शनमध्ये असिनने केले पतीला KISS, जॅकलीन-शिल्पासह पोहोचले अनेक सेलेब्स

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
असिन-राहुलच्या रिसेप्शनमधील धमाल-मस्ती - Divya Marathi
असिन-राहुलच्या रिसेप्शनमधील धमाल-मस्ती
मुंबई- असिन आणि मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर राहुल शर्माच्या लग्नाचे रिसेप्शन मुंबईच्या पंचतारांकित हॉटेल फोन सीजन्समध्ये झाले. यावेळी अभिनेत्री शिल्पा शेट्टी, जॅकलीन फर्नांडिस, दिग्दर्शक साजिद खान आणि निर्माती अश्विनी यार्डीसह अनेक सेलेब्स दोघांना शुभेच्छा देण्यासाठी पोहोचले.
राहुल शर्माने घेतले असिनच्या फ्रेंड्ससोबत सेल्फी...
- असिनचा पती राहुल शर्मा रिसेप्शनमध्ये तिच्या फ्रेंड्ससोबत सेल्फी घेताना दिसला.
- केवळ राहुलच नव्हे अश्विनी यार्डी, ऑथर श्रीधर पिल्लईसह अनेक सेलेब्ससुध्दा रिसेप्शनदरम्यान सेल्फी मूडमध्ये दिसले.
- सेलेब्सने आपआपल्या टि्वटर हँडलवर रिसेप्शनमध्ये क्लिक केलेले सेल्फी पोस्ट केले आहेत.
19 जानेवारीला झाले लग्न...
- असिन-राहुलचे लग्न 19 जानेवारीला नवी दिल्लीच्या हॉटेल दुसित देवरानमध्ये झाले.
- लग्न दोन धर्मानुसार झाले. सकाळी ख्रिश्चन आणि रात्री हिंदु पध्दतीने असिन आणि राहुल लग्नाच्या बेडित अडकले.
- हा एक खासगी समारंभ होता आणि यात फक्त दोघांचे नातेवाईक आणि परिचयातील काही फ्रेंड्स उपस्थित होते.
- बॉलिवूडमधून एकमेव अक्षय कुमारला आमंत्रण देण्यात आले होते. अक्षयने असिन आणि राहुलची भेट घालून दिली होती.
जेव्हा परत गेले होते लग्न लावण्यासाठी आलेले 21 पंडित...
- असिनच्या लग्नादरम्यान एका मोठा ड्रामासुध्दा पाहायला मिळाला होता.
- वेडिंग सेरेमनी दिल्लीच्या लग्झरी हॉटेल 'दुसित देवरान'मध्ये चालू होती.
- परंतु सप्तपदीच्या विधीसाठी आलेले 21 पंडित नाराज होऊन विधी पूर्ण न करताच तिथून निघून गेले.
- पंडित अमरेश मिश्राने सांगितले, 'मंगळवारी रात्री सप्तपदीची विधी पूर्ण करण्यासाठी आम्ही 21 पंडितांसोबत बातचीत केली होती. वेडिंग कॉन्ट्रॅक्टरने आम्हाला म्हणाला, 2100 रुपये दक्षिणा मिळेल. परंतु आम्ही हॉटेलमध्ये पोहोचलो तर आम्हाला सांगितले, की केवळ 500 रुपये मिळतील.'
- त्यामुळे आमचे सहकारी नाराज झाले आणि निघून गेले.
- अमरेश यांनी सांगितले, 'आम्ही आमच्या खर्चाने हॉटेलपर्यंत पोहोचलो होतो. परंतु आम्हाला सांगण्यात आले, की असिन-राहुलच्या लग्नासाठी कमी वयाचे पंडित हवे आहेत.'

कोणत्या कॉस्ट्युममध्ये दिसली असिन...
- ख्रिश्चन पध्दतीने झालेल्या वेडिंग सेरेमनीमध्ये फॅमिली आणि फ्रेंड्स मिळून 50 लोक उपस्थित होते. यामध्ये अक्षय कुमार सामील झाला होता.
- रात्री दोघे हिंदू धर्मानुसार लग्नगाठीत अडकले. यादरम्यान जवळपास 200 पाहूणे सामील झाले होते.
- डिनर पूर्णत: इंडियन आणि शाकाहारी होते. डिनर हॉटेलच्या लॉन एरिया तसेच बॉलरुममध्ये ठेवण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असिन-राहुलच्या रिसेप्शनमध्ये सेलेब्सने क्लिक केलेले सेल्फी...पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असिन-राहुलच्या रिसेप्शनमध्ये शूट केलेले व्हिडिओ...
(हे व्हिडिओ actor_asinfc या इंस्टाग्रामवरून घेण्यात आले आहेत.)