आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Asin And Rahul Sharma Are Headed For Their Honeymoon!

हनीमूनला रवाना झाले असिन-राहुल, रिसेप्शनचे Inside Photos सुद्धा आले समोर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः असिन आणि तिचा नवरा राहुल शर्मा अलीकडेच मुंबई विमानतळावर दिसले. यावेळी या दोघांनीही फोटोग्राफर्ससमोर येणे टाळले. हे दोघेही हनीमूनसाठी रवाना झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, असिन आणि राहुल एक महिन्याच्या सुटीवर असून न्यूयॉर्कमध्ये हनीमून साजरा करणार आहेत.
असिनने राहुलला दिल्या शुभेच्छा
राहुलला अलीकडेच आयटी पर्सन ऑफ द इयर या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यानिमित्ताने असिनने त्याचे एक फोटो शेअर करुन त्याला शुभेच्छा दिल्या. असिनने लिहिले, "CONGRATSSSSSS I.T PERSON OF THE YEAR!!!"
19 जानेवारीला झाले होते लग्न...
असिन आणि राहुल यावर्षी 19 जानेवारीला विवाहबद्ध झाले. दिल्लीतील हॉटेल दुसित देवरान येथे पहिले ख्रिश्चन आणि नंतर हिंदू पद्धतीने दोघांचे लग्न झाले. यावेळी अभिनेता अक्षय कुमार उपस्थित होता. राहुल मायक्रोमॅक्सचा को-फाऊंडर असून अक्षयने त्याची भेट असिनसोबत घालून दिली होती.
रिसेप्शनचे इनसाइड फोटोज आले समोर...
23 जानेवारी रोजी मुंबईतील फोर सीझन हॉटेलमध्ये असिन आणि राहुलचे वेडिंग रिसेप्शन झाले. या कार्यक्रमातील काही इनसाइड फोटोज समोर आले आहेत. या फोटोजमध्ये हे कपल परफॉर्म करताना आणि इतर स्टार्ससोबत फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, रिसेप्शनची इनसाइड छायाचित्रे...