आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बालाजी फिल्मच्या कंत्राटदारावर गोळीबार, 20 फुटांवर होते अमिताभ बच्चन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हल्लेखोर घटनास्थळी सोडून गेलेली बाईक - Divya Marathi
हल्लेखोर घटनास्थळी सोडून गेलेली बाईक
मुंबई - गोरेगाव फिल्मसिटी येथे दोन अज्ञातांनी बालाजी फिल्मशी संबंधीत कंत्राटदार राजू शिंदेवर तीन राऊंड फायर केले. त्याला दोन गोळ्या लागल्या. एक त्याच्या हातात तर दुसरी पोटात घुसली. त्याची स्थिती गंभीर आहे. शिंदेवर नानावटी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. ज्यावेळी हा हल्ला झाला तेव्हा, तेथून 20 फुटांवर बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांचे चित्रिकरण सुरु होते. त्यांनी ट्विट करुन हल्ल्यात एक व्यक्ती ठार झाल्याचे म्हटले.
गोळीबाराचा आवाज ऐकल्यानंतर काही लोकांनी हल्लेखोरांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला मात्र हल्लेखोर पळून जाण्यात यशस्वी झाले. शिंदे यांच्यावर झालेला हल्ला गँगवार आहे, की राजकीय वैमनस्यातून हल्ला करण्यात आला याचा पोलिस शोध घेत आहे.

दुपारी दोन वाजता हल्ला
राजू शिंदे फिल्मसिटी येथील त्याच्या कार्यालयाबाहेर बसलेला असताना बाइकवरुन आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्याच्यावर गोळीबार केला. तिथे उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण हल्लेखोर त्यांच्या हाती लागले नाही.

बाईक सोडून पळाले हल्लेखोर
बाईकवरुन आलेल्या हल्लेखोरांनी गोळीबार केल्यानंतर घटनास्थळावरुन पळ काढला. मात्र काही अंतरावर गेल्यानंतर त्यांनी बाईक सोडून दिली आणि ते पायी पळले. पोलिसांनी बाईक ताब्यात घेतली असून तिच्या मालकाचा शोध घेतला जात आहे. घटनास्थळी वरिष्ठ पोलिस अधिकारी फत्तेसिंह पाटील हजर झाले. वैयक्तिक वादातून हल्ला झाला असण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

कोण आहे राजू शिंदे ?
श्रीकांत उर्फ राजू शिंदे हा आरे कॉलनीच्या साईबाबा मंदिराचा संस्थापक असून स्थानिक केबल ऑपरेटर आहे. फिल्मसिटी मध्ये त्याचा दबदबा आहे. चित्रपट अभिनेते जितेंद्र यांची कन्या एकता कपूर हिच्या बालाजी फिल्मच्या सुरक्षा यंत्रणेचा तो कंत्राटदार आहे. तर सध्या त्याने रिअल इस्टेट क्षेत्रात काम सुरु केले होते. तसेच शिवसेनेच्या चित्रपट सेनेचा तो सरचिटणीस असल्याचेही सांगितले जाते. गेल्या महिन्यात एका प्रकरणात ठाणे सत्र न्यायालयाने त्याला निर्दोष सोडले होते.

20 फुटांवर बिग बींचे शुटिंग
हा गोळीबार झाला, त्याच्या जवळच एक गावाचा सेट उभारण्यात आला आहे. तिथे आज अमिताभ बच्चन यांचे चित्रीकरण सुरू होते. या घटनेने फिल्मसिटीमध्ये चिंता आणि भीतीचे वातावरण आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा, बिग बींचे ट्विट आणि घटनेसंबंधी छायाचित्रे