आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुमोनाच्‍या वडीलांवर रिक्षाचालकाचा हल्‍ला, या कारणामुळे झाले भांडण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडील सुजीत चक्रवर्तीसोबत सुमोना. - Divya Marathi
वडील सुजीत चक्रवर्तीसोबत सुमोना.
मुंबई- कपिल शर्माच्‍या ऑनस्‍क्रीन वाइफचा रोल प्‍ले करणा-या अॅक्‍ट्रेस सुमोना चक्रवर्तीच्‍या वडीलांसोबत नुकतीच एक मोठी घटना घडली. सुमोनाचे वडील सुजीत चक्रवर्ती (56) यांच्‍यावर अंधेरीमध्‍ये एका रिक्षाचालकाने हल्‍ला केला. हल्‍ल्‍यामध्‍ये त्‍यांच्‍या डोक्‍याला गंभीर दुखापत झाली आहे. याची माहिती मिळताच सुमोनाच्‍या आईने त्‍यांना ताबडतोब रुग्‍णालयात दाखल केले. 

पैशांवरुन झाला वाद
- सुमोना यांनी याबाबत माहिती दिली की, 'मी कुटुंबासोबत अंधेरीतील सेव्‍हन हिल्‍स हॉस्पिटलजवळ राहतो. आईची तब्‍येत ठीक नसल्‍याने वडील त्‍यांना हॉस्स्पिटलमध्‍ये घेऊन जात होते.' 
- बराच काळ वाट पाहिल्‍यावरही त्‍यांना ऑटोरिक्षा मिळाला नाही. अखेर एक रिक्षावाला हॉस्पिटलला जाण्‍यासाठी तयार झाला. मात्र आम्‍हाला गरज असल्‍यामुळे त्‍याने वडीलांना जास्‍तीचे भाडे सांगितले. 
- यावरुन वडील व रिक्षाचालकामध्‍ये भांडण सुरु झाले. रिक्षाचालक ऐकत नाही हे पाहून वडील मागे हटले होते. मात्र रिक्षाचालक थांबला नाही. तो वडीलांशी भांडतच राहिला. 
- पहिले त्‍याने वडीलांच्‍या डोक्‍यात मारले. नंतर बुक्‍का मारुन त्‍यांना खाली पाडले. 

डोक्‍यातून येत होते रक्‍त 
- सुमोनाने सांगितले की, डोक्‍याला गंभीर दुखापत झाल्‍याने वडीलांच्‍या डोक्‍यातून रक्‍त वाहत होते. 
- यानंतर आईने ताबडतोब त्‍यांना हॉस्पिटलमध्‍ये दाखल केले. हॉस्पिटलमध्‍ये डॉक्‍टरांनी पूर्ण घटनेची माहिती पोलिसांना दिली आहे. 
- यानंतर पोलिसांनी रिक्षाचालकाला अटक केली आहे. 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फॅमिलीसोबत सुमोनाचे फोटोज... 
 
 
बातम्या आणखी आहेत...