आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Avantika Malik And Imran Khan’S Daughter Imara Turns One

एक वर्षाची झाली इमरानची मुलगी इमारा, समोर आले FAMILY PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(आई अवंतिका आणि वडील इमरान खानसोबत चिमुकली इमारा मलिक खान)
मुंबईः अभिनेता इमरान खान आणि अवंतिका मलिक यांची मुलगी इमारा मलिक खान 9 जून रोजी एक वर्षांची झाली. इमरान आणि अवंतिकाने सुरुवातीपासून आपल्या या नन्हीं परीला मीडियापासून दूर ठेवले. मात्र अलीकडेच या कुटुंबाची काही छायाचित्रे प्रकाशित झाली आहेत. यामध्ये पिंक व्हाइट अँड ब्लू कलरच्या फ्रॉकमध्ये इमारा खूप क्यूट दिसतेय. मम्मी-पापासोबतचे इमाराचे हे छायाचित्र परफेक्ट पिक्चर म्हणायला हरकत नाही.
एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत अवंतिकाने इमाराचे बर्थडे प्लान्स शेअर केले. अवंतिकाने सांगितले, "इमाराच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्ही प्ले जिममध्ये कुटुंबीय आणि जवळच्या मित्रांसाठी गेट-टु-गेदर ठेवले होते. येथे सर्वांनी खूप एन्जॉय केले."
या खास निमित्ताने बी टाऊनच्या या कपलने तीन आठवड्यांचा यूरोप टूर प्लान केला आहे. यासाठी इमरान खूप उत्साहित आहे.
'जाने तू या जाने ना' या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा इमरान गर्लफ्रेंड अवंतिका मलिकसोबत 2011 मध्ये विवाहबद्ध झाला. 9 जून 2014 रोजी दोघांच्या घरी इमाराचे आगमन झाले.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, वडील इमरान आणि आई अवंतिकासोबतची चिमुकल्या इमाराची ही खास छायाचित्रे...