आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Hashmi discloses: बायोपिकमध्ये अझहरुद्दीनच्या अफेअर्सवर बाळगण्यात येईल मौन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाचहून अधिक सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर अभिनेता इमरान हाश्मीला 'हमारी अधुरी कहानी' या सिनेमाने थोडासा दिलासा मिळाला आहे. या सिनेमामुळे त्याचे बुडत्या करिअरला आधार मिळाला आहे. आता त्याच्याकडे एक सिनेमा आहे. मोहम्मद अझहरुद्दीनचा बायोपिक 'अझहर'.
या सिनेमात अझहरुद्दीन यांची पहिली पत्नी नौरीन आणि दुसरी पत्नी संगीता बिजलानी यांचा उल्लेख असणार आहे. संगीता बिजलानीपासून विभक्त झाल्यानंतर अझहर यांचे बॅडमिंटन खेळाडू ज्वाला गुट्टा आणि शैनन मेरी तलवार यांच्यासोबत अफेअर असल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर त्यांनी खासगी आयुष्यात सावध राहणे सुरु केले आणि आपले नाते कधीही उघड होऊ दिले नाही.
सिनेमात या सर्व अफेअर्सचा उल्लेख करण्यात येणार नाहीये. ज्वालाचे पात्र वेगळ्या पद्धतीने सादर करण्यात येणार आहे. सिनेमाचा हीरो इमरान हाश्मीने सांगितले, बरीच रहस्य असून ती कायम ठेवण्यात येणार आहेत. मे 2016 मध्ये हा सिनेमा रिलीज होणारेय. कदाचित तोपर्यंत काही बदल घडतीलसुद्धा.
सध्या स्क्रिप्टचा एक ड्राफ्ट तयार असून अद्याप शूटिंगला सुरुवात झालेली नाही. मी अझहर भाईचे सिग्नेचर शॉट शिकतोय. ते ब-याच दिवसांपासून माझ्यासोबत आहेत.
अझहर यांच्या अफेअर्सच्या सादरीकरणावर सिनेमॅटिक लिबर्टी किती असेल, यावर इमरान म्हणाला, एन्टरटेन्मेंटसाठी सिनेमॅटिक लिबर्टी घेतली जाईल. मात्र सिनेमाच्या मुळ गाभ्याला आणि मुळ तत्वांना हात लावला जाणार नाही.
बातम्या आणखी आहेत...