आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

\'बाहुबली-2\'चे दोन सीन रिलीजपूर्वीच लीक, फुटेज चोरणारा ग्राफिक डिझायनर अटकेत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्लीः बहुचर्चित ‘बाहुबली: दी कन्क्लुझन’ या सिनेमाचे दोन सीन रिलीजपूर्वीच लीक झाले आहेत. नऊ मिनिटांचे फुटेज चोरणा-या एका ग्राफिक डिझायनरला पोलिसांनी अटक केली आहे. शूटिंगच्या काळात या व्यक्तीने सिनेमाचे काही सीन्स चोरल्याचे म्हटले जात आहे. हा सिनेमा 'बाहुबली : द बिगिनिंग'चा दुसरा पार्ट आहे. बाहुबली या सिनेमाने 2015 मध्ये सर्वाधिक कमाई केली होती. प्रेक्षक या सिनेमाच्या दुस-या भागाची खुपच आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, रिलीज होण्यापूर्वीच या सिनेमाचा तब्बल नऊ मिनिटांचा एक पार्ट लीक झाला आहे. या प्रकरणी सिनेनिर्मात्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली असुन या प्रकरणी हैदराबाद पोलिसांनी एकाला अटक केली आहे. ‘बाहुबली: दी कन्क्लुझन’ हा सिनेमा 2017 मध्ये रिलीज होणारेय. कसे चोरले फुटेज, कशी झाली अटक...
- मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथून एका ग्राफिक डिझायनरला पोलिसांनी अटक केली आहे.
- हैदराबादमधील जुबली हिल्स पुलिस स्टेशनमध्ये बाहुबली या सिनेमाचे डायरेक्टर एसएस राजमौली यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे.
- सिनेमातील मुख्य अभिनेता प्रभास आणि अभिनेत्री अनुष्का शेट्टी यांच्यातील एक सीन लीक झाला असल्याची माहिती आहे. बाहुबलीने कटप्पाला का मारलं, या प्रश्नाचं उत्तर या पार्टमध्ये असल्याचं बोललं जात आहे.
- डिझायनरने हे फुटेज इंटरनेटवर लीक केले असून ते व्हायरल झाले आहे.
- अटक झालेला डिझायनर हैदराबादच्या अन्नपूर्णा स्टूडिओत काम करात होता.
बातम्या आणखी आहेत...