आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली 2' : जेव्हा पाच मिनिटांच्या बदलासाठी झाले 50 दिवस शूटिंग

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः 'बाहुबली: 2 द कनक्लूजन' या सिनेमाचा फस्ट लूक शनिवारी रिलीज झाला. मामी फिल्म फेस्टिव्हलमध्ये सिनेमाचे दिग्दर्शक एस.एस. राजामौली यांनी प्रभास, तमन्ना, अनुष्का शेट्टी आणि निर्माता शोबू यांच्या उपस्थितीत फस्ट लूक लाँच केला. यावेळी झालेल्या बातचीतमध्ये राजामौली यांनी सांगितले, की बाहुबली सिनेमा एवढा हिट ठरेल, असे कधी त्यांना स्वप्नातसुद्धा वाटले नव्हते. ते सांगतात, "हिंदी भाषिक प्रेक्षकांनी या सिनेमाला पसंतीची पावती दिल्यानंतर पहिल्या विकेण्डमध्ये आमचा विश्वास वाढला. मात्र आम्ही दुस-या सिनेमा काही बदल केलेला नाही. सुरुवातीपासूनच आम्ही जो विचार केला होता, त्याच लाइनवर आम्ही केले. होय, स्केल आणि कॅनव्हास थोडा आणखी नक्कीच मोठा झालाय."

किती वेगळा असलेला 'बाहुबली 2'...
ही कहाणी किती वेगळी असेल? यावर राजामौली सांगतात, "पहिल्या फिल्ममध्ये आम्ही पात्रांची ओळख करुन दिली आणि दुस-या भागात आता त्यांचे इमोशन्स समोर येतील. अॅक्शन भरपूर आहे. इमोशन्स माझ्या सिनेमाप्रमाणे लार्जद दॅन लाइफ असतील." प्रभास सांगतो, "दुस-या भागातील इंटरवलपूर्वीच्या काही भागात राजामौलींना बदल अपेक्षित होते. त्यांनी मला सांगितले, की पाच मिनिटांचा सीन आहे. 2-3 बदल करायचे आहेत. हे आपण पाच दिवसांत शूट करु. मात्र जेव्हा बदल करुन झाले, तोपर्यंत 50 दिवसांचा काळ लोटला होता." सिनेमासाठी प्रभासने 100 किलो वजन होते. मात्र तमन्नाच्या एन्ट्रीनंतर त्याला वजन कमी करावे लागले. तर तमन्नाला वजन वाढवावे लागले.

स्पेशल कॅमेरा केला तयार...
'बाहुबली 2' हा सिनेमा बीबी 360 या स्पेशल कॅमे-याने शूट करण्यात आला. या सिनेमासाठी हा खास कॅमेरा तयार करण्यात आला. जॉन ग्राफेटच्या टीमने हा कॅमेरा बनवला. राजामौलींच्या व्हिजनला प्रेक्षकांपर्यंत योग्यरित्या पोहोचवण्यासाठी हा बनवण्यात आला. एप्रिलमध्ये देश-विदेशातील 50 लोकेशन्सवर हा कॅमेरा वीआर रिअॅलिटी दाखवण्यासाठी वापरण्यात आला.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झालेले 'बाहुबली 2' या सिनेमाचे शूटिंग फोटोज...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...