आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'बाहुबली 2: द कन्क्लूजन' चीनमध्ये होणार रिलीज, 4000 स्क्रीन्सवर दाखविला जाणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई -  प्रभास आणि राणा डुग्गुबाती यांची मुख्य भूमिका असलेला 'बाहुबली 2: द कन्क्लूजन' आता चीनमध्ये रिलीज होण्याच्या तयारीत आहे. ट्रेंड अॅनलिस्ट रमेश बाला यांनी ट्वीटरवरुन ही बातमी फॅन्ससोबत शेअर केली आहे. हा चित्रपट सप्टेंबरमध्ये जवळपास 4000 स्क्रीन्सवर दाखविला जाणार आहे. यासाठी बाहुबलीचे कलाकार लवकरच याचे प्रमोशनही करणार आहेत. “#Baahubali2 will release in #China in Sep’17 in 4,000 Screens. Stars will go to #China for Promotions.” असे रमेश बालाने ट्वीट केले आहे.
 
जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, फिल्ममेकर्स लवकरच चीनला भेट देणार आहेत. त्यांनी चायनीज मार्केटमध्ये त्यांचा चित्रपट वितरीत करण्यासाठी ई स्टार कंपनी हायर केली आहे. याच कंपनीने आमिरचा दंगल चित्रपट रिलीज केला होता. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजामौली यांचा बाहुबली २ चीनमध्ये कमीतकमी 200 कोटींचा व्यवसाय नक्की करेन. काही दिवसांपूर्वीच चीनमध्ये रिलीज झालेल्या दंगल चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 1000 कोटींचा व्यवसाय केला होता. 
बातम्या आणखी आहेत...