आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baahubali Fame Actor Prabhas Meets PM Narendra Modi Asks Him To Watch Film

\'बाहुबली\'ने घेतली पंतप्रधान मोदींची भेट, सिनेमा बघण्याची केली विनंती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना अभिनेता प्रभास. - Divya Marathi
पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेताना अभिनेता प्रभास.
नवी दिल्ली : बॉक्स ऑफिसवर अलीकडेच रिलीज झालेला नवनवीन रेकॉर्ड प्रस्थापित करणारा सिनेमा म्हणजे बाहुबली. या सिनेमात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभासने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेऊन त्यांना हा सिनेमा बघण्याची विनंती केली.
पंतप्रधानांना भेटण्यासाठी 35 वर्षीय प्रभास त्याचे काका आणि अभिनेता कृष्णम राजू आणि काकू सोबत आला होता. या भेटीची दोन छायाचित्रे मोदी यांनी ट्विटरवर पोस्ट करुन ट्विट केले, ''आज 'बाहुबली' स्टार प्रभास भेटला.'' छायाचित्रामध्ये मोदी 'बाहुबली' सिनेमाला मिळालेल्या यशाबद्दल प्रभासची पाठ थोपटताना दिसत आहेत.
काहीच दिवसांपूर्वी प्रभासने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती. त्यानंतर राजनाथ यांनी सिनेमा बघण्याची इच्छा असल्याचे ट्विटद्वारे म्हटले होते. आतापर्यंत दक्षिण भारतातील अनेक दिग्गज नेते आणि मंत्र्यांनी 'बाहुबली' पाहिला आहे. दिग्दर्शक राजमौली यांच्या 10 जुलै रोजी या सिनेमाने आतापर्यंत 400 कोटींचा पल्ला गाठला आहे.
पुढे पाहा, प्रभास आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीची छायाचित्रे...