आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यामुळे तोडला जाणार बाहुबलीचा सेट, तयार करण्यासाठी खर्च झाले 35 कोटी रुपये

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हैदराबाद - डायरेक्टर एस.एस. राजामौलीची फिल्म 'बाहुबली'चा  येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये असलेला सेट लवकरच जमीनदोस्त होणार आहे. फिल्मसिटीच्या एका गाइडने DivyaMarathi.com ला सांगितले, की 'बाहुबली'च्या यशानंतर फिल्मसिटीच्या टीमने निर्मात्यांकडून हा सेट 5 कोटींमध्ये खरेदी केला होता. रामोजी फिल्मसिटीने हा सेट सामान्यांसाठी खुला केला होता. त्यासाठी शुल्क आकारले जात होते. बाहुबलीचा भव्य सेट पाहाण्याची सामान्यांमधील उत्सूकता मोठी होती. तिकीट खरेदी करुन लोक मोठ्या प्रमाणात सेट पाहाण्यासाठी येत होते. आता फिल्मसिटीने सेटवर केलेला खर्च वसूल झाला आहे. 

 

का जमीनदोस्त होत आहे सेट... 
- गाइडला जेव्हा हा प्रश्न केला तेव्हा तो म्हणाला, फिल्मसिटीमध्ये आणखी एका फिल्मचा सेट उभारला जाणार आहे. तो बाहुबलीच्या जागेत उभा राहाणार आहे. 
- नव्या सेटच्या उभारणीसाठी बाहुबलीचा सेट जानेवारीमध्ये तोडला जाणार आहे.

 

35 कोटी आला होता खर्च 
- रामोजी फिल्मसिटीचा संपूर्ण परिसर जवळपास 2000 एकर आहे. यातील 15 एकरावर बाहुबलीचा सेट उभारण्यात आला होता. सेटची उभारणी प्रोडक्शन डिझायनर साबू सायरिल यांनी केली होती. 
- फिल्मच्या पहिल्या पार्टमध्ये महिष्मती साम्राज्याचा सेट उभारण्यासाठी 28 कोटी रुपये खर्च आला होता. 
- फिल्मच्या दुसऱ्या भागासाठी काही नवी जोडणी करुन काही सीन शूट केले गेले होते. नव्या साम्राज्याचा सेट तयार करण्यासाठी 35 कोटी रुपये खर्च आला होता. 
- बाहुबलीचा सेट तयार करण्यासाठी 500 कामगारांनी जवळपास 50 दिवस सतत काम केले होते.    

 

पुढील स्लाइडमध्ये पाहा, फिल्मसिटीने असे जिवंत ठेवले महिष्मती साम्राज्य...

बातम्या आणखी आहेत...