चेन्नईः एस.एस. राजामौली दिग्दर्शित 'बाहुबली' हा सिनेमा येत्या मे महिन्यात चीनमध्ये रिलीज होणारेय. तब्बल सहा स्क्रिन्सवर हा सिनेमा तेथे रिलीज करण्यात येणार आहे. भारतात साडे सातशे कोटींपेक्षा अधिकचा व्यवसाय करुन या सिनेमाने नवा विक्रम प्रस्थापित केला. आता चीनमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात रिलीज होऊन या सिनेमाने नवीन विक्रमच रचला आहे. यापूर्वी चीनमध्ये
पीके हा भारतीय सिनेमा पाच हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता.
सिनेमाशी निगडीत सूत्राने दिलेल्या माहितीनुसार, ''चीनमध्ये एवढ्या स्क्रिन्सवर रिलीज होणारा हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. 'बाहुबली'ने आमिर खानच्या 'पीके'ला मागे टाकले आहे. पीके पाच हजार स्क्रिन्सवर चीनमध्ये रिलीज झाला होता. या महिन्यात बाहुबली सिनेमा तेथे रिलीज करण्याचा निर्मात्यांचा मानस होता. मात्र योग्य तारीख उपलब्ध न झाल्याने रिलीज पुढे ढकलण्यात आले.''
चीनपूर्वी हा सिनेमा लॅटिन अमेरिका आणि जापानसह 30 हून अधिक देशांमध्ये रिलीज झाला आहे. सध्या बाहुबलीच्या सिक्वेलचे काम सुरु असून तो भारतात यावर्षीच्या अखेरीस किंवा पुढील वर्षी रिलीज होणारेय.