आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Baba Ramdev Visit To Sanjay Dutt In Yerawada Central Jail

बाबा रामदेवांनी तुरुंगात घेतली संजयची भेट, \'माझ्या सुटकेसाठी प्रार्थना करा\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः बाबा रामदेव गुरुवारी पुण्यातील येरवडा तुरुंगात कैद्यांना योगा शिकवण्यासाठी पोहोचले होते. इतर कैद्यांसोबत याच तुरुंगात सध्या शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्तसुद्धा उपस्थित होता. योगा सेशननंतर रामदेव यांनी संजयसोबत बातचित केली. संजयची येत्या 25 फेब्रुवारी रोजी तुरुंगातून सुटका होणारेय. मुंबई बॉम्ब स्फोटप्रकरणी त्याला 5 वर्षांची शिक्षा ठोठावण्यात आली होती.
बाबा रामदेव यांना काय म्हणाला संजय दत्त?
- आयएएनएस या न्यूज एजन्सीच्या मते, बाबा रामदेव नेहमीप्रमाणेच त्यांच्या भगव्या पोशाखात होते. त्यांनी कैद्यांना योगासने शिकवली.
- संजय दत्त इतर कैद्यांसह मंचाच्या समोर बसला होता. त्याने प्रिजन युनिफॉर्म परिधान केला होता.
- योग सेशन संपल्यानंतर दोघांची भेट झाली. सूत्रांच्या मते, संजयने बाबा रामदेव यांच्याकडे त्याच्या सुटकेसाठी देवाकडे प्रार्थना करण्यास सांगितले.
यापूर्वीही झाली आहे दोघांची भेट
- रामदेव आणि संजय दत्त यांची जुनी ओळख आहे.
- गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सवात दोघांची भेट झाली होती. त्याकाळात संजय एक महिन्याच्या पॅरोलवर बाहेर होता.
- बॉलिवूडमध्ये रामदेव यांच्यावर एक सिनेमा तयार होत असल्याचे वृत्त आहे. या सिनेमात भ्रष्टाचाराविरोधात त्यांचा लढा दाखवण्यात येणारेय.
पुढे वाचा, का तुरुंगात आहे संजय दत्त...