आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पहिल्याच दिवशी 50 कोटींचा गल्ला जमवणारा पहिला भारतीय सिनेमा ठरला \'बाहुबली\'

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बाहुबली'च्या पोस्टरवर दाक्षिणात्य अभिनेता प्रभास)
मुंबई- शुक्रवारी अर्थातच 10 जुलै रोजी रिलीज झालेल्या 'बाहुबली' या सिनेमाने बॉक्स ऑफिसचे सर्व विक्रम मोडित काढत पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई केली आहे. रिलीजच्या पहिल्याच दिवशी एवढी मोठी कमाई करणारा 'बाहुबली' हा पहिला भारतीय सिनेमा ठरला आहे. ट्रेंड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी टि्वट करून याची माहिती दिली आहे.
या सिनेमाने शाहरुख खानच्या 'हॅप्पी न्यू इअर'चा विक्रम मोडित काढला आहे. 2014मध्ये रिलीज झालेल्या शाहरुख-दीपिका स्टारर 'हॅप्पी न्यू इअर' सिनेमाने पहिल्या दिवशी 44.97 कोटींची कमाई केली होती.
आदर्श यांनी टि्वट केले, "#Baahubali creates HISTORY. Records HIGHEST EVER Day 1 biz in *all versions*: 50 cr. India biz. PHENOMENAL. UNPRECEDENTED."
उत्कृष्ट स्पेशल इफेक्ट्स-
'बाहुबली' सर्वात महागडा सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. त्यामध्ये स्पेशल इफेक्ट्सचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. काही समीक्षक तज्ञ या सिनेमाला '300' या हॉलिवूड सिनेमाला दिलेले भारतीय उत्तर असेही म्हणत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आहेत. राजामौली यांनी 2012मध्ये राष्ट्रीय पुरस्कारावर मोहोर उमटवणा-या 'मक्खी' या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते. 'बाहुबली' सिनेमात प्रभास, राणा दग्गुबती, तमन्ना भटीया यांच्या मुख्य भूमिका आहेत.
पुढील स्लाइडवर क्लिक करून एक नजर टाकूया बॉलिवूडच्या फस्ट डे सर्वाधिक कलेक्शन करणा-या टॉप-5 सिनेमांवर...