आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बॉक्स ऑफिसवर 'बाहुबली'चा दबदबा, 2 दिवसांत 100 कोटींची कमाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुबंई- शुक्रवारी (10 जुलै) रिलीज झालेल्या 'बाहुबली' सिनेमाने सुरुवातीच्या दोन दिवसांत 100 कोटींचा गल्ला जमावला आहे. सिनेमाने पहिल्याच दिवशी 50 कोटींची कमाई करून सर्व विक्रम मोडित काढले होते. तसेच शनिवारी सिनेमा 55 कोटींच्या घरात गेला. रविवारी सकाळी सिनेमाचे 90% शो हाऊसफुल होते. याचा अंदाज लावण्यास असे म्हटले जाऊ शकते, की सिनेमा तिस-या दिवशी जवळपास 58 कोटींचा कमाई करू शकेल. एकूणच, सुरुवातीच्या तीन दिवसांत 'बाहुबली' 150 कोटींपेक्षा जास्त बिझनेस करू शकतो.
सिनेमा अनेक भाषांमध्ये रिलीज झाला आहे. याच्या हिंदी व्हर्जनमध्येसुध्दा दुस-या दिवशी 40% वाढ झाली आहे. 'बाहुबली'च्या हिंदी व्हर्जनने शुक्रवारी (10 जुलै) 5.15 कोटी, शनिवारी 7.09 कोटींची कमाई केली आहे.
250 कोटींपेक्षा जास्त बजेटमध्ये तयार झालेला 'बाहुबली' सर्वात महागडा भारतीय सिनेमा असल्याचे सांगितले जात आहे. सिनेमा डोळे दीपवणा-या इफेक्ट्सचा वापर करण्यात आला आहे. काही तज्ञ सिनेमाला '300' या हॉलिवूड सिनेमाला दिलेले भारतीय उत्तर असे मानत आहेत. सिनेमाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली आहेत. सिनेमामध्ये प्रभास, राणा दुग्गबती, तमन्ना भाटीया यांच्या मुख्य भूमिका आहेत.