आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मोदींच्या मंत्रीमंडळातील बाबुल सुप्रियोचा साखपुडा, लग्नाची बातमी ऐकून थक्क झाले नरेंद्र मोदी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बाबुल सुप्रियो यांच्या साखरपुड्याचे छायाचित्र - Divya Marathi
बाबुल सुप्रियो यांच्या साखरपुड्याचे छायाचित्र
कोलकाताः मोदी सरकारमधील राज्यमंत्री बाबुल सुप्रियो यांचा साखरपुडा झाला आहे. त्यांनी एअर होस्टेससोबत साखरपुडा केला आहे. बाबुल येत्या ऑगस्टमध्ये लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. रचना शर्मा हे त्यांच्या भावी पत्नीचे नाव आहे. दिल्लीची रहिवाशी असलेली रचना जेट एअरवेजमध्ये काम करते. येत्या 9 ऑगस्टला दोघांचे लग्न होणारेय.

फ्लाइटमधल्या भेटीनंतर सुरु झाली लव्ह स्टोरी...
- आनंद बाजार पत्रिका या बांग्ला वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत बाबुल सुप्रियो यांनी आपल्या या नात्याविषयी मनमोकळेपणाने सांगितले.
- अचानक लग्नाचा निर्णय कसा घेतला, या प्रश्नाचे उत्तर देताना ते म्हणाले, "गेल्या दोन वर्षांत मी विमानप्रवास खूप केला. जमीनीपासून हजारो फूट उंचावर आमची भेट झाली. असे वाटले, जणू कुणी आमची स्क्रिप्ट लिहितंय."
- "बाबा रामदेव यांच्यासोबत माझी भेट विमान प्रवासादरम्यान झाली होती. तेच मला पॉलिटिक्समध्ये घेऊन आले. फ्लाइटमध्ये प्रवास करत असताना बाबा रामदेव आणि माझी बातचित सुरु असताना तेथे उपस्थित रचनाने मला म्हटले होते, की जर तुम्हाला तिकिट मिळाले, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल."
- "पुढच्या फ्लाइटमध्ये पुन्हा रचनासोबत माझी भेट झाली. मी तिचा नंबर घेतला आणि आमचे बोलणे सुरु झाले."
- "या दोन प्रवासांत केवळ दहा दिवसांचे अंतर होते."
- बाबुल यांनी सांगितले, की ते दररोज त्यांचे एक गाणे रचनाला व्हॉट्सअॅपवर पाठवायचे.

लग्नाची बातमी ऐकून आश्चर्यचकित झाले होते मोदी...
- लग्नाची बातमी ऐकल्यानंतर मोदी यांनी काय म्हटले? यावर बाबुल यांनी सांगितले, "लग्नाची बातमी ऐकून ते पहिले आश्चर्यचकित झाले."
- काही वेळाने त्यांनी मला बेस्ट ऑफ लक म्हटले होते.
- लग्नाला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींना आमंत्रित करणार असल्याचे बाबुल सुप्रियो यांनी सांगितले.

सुप्रियो यांचा झालाय घटस्फोट...
- राजकारणात येण्यापूर्वी बाबुल सुप्रियो गायक म्हणून प्रसिद्ध होते आणि त्यांचे लग्न झाले होते.
- 1995 मध्ये रिया नावाच्या तरुणीसोबत त्यांचे लग्न झाले होते, मात्र 2006 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला.
- रियासोबत बाबुल यांची भेट शाहरुख खानच्या एका प्रोग्रामध्ये टोरंटोत झाली होती.
- दोघांची एक मुलगी असून 2002 मध्ये तिचा जन्म झाला. शर्मिली हे तिचे नाव आहे.

पुढील स्लाईड्समध्ये बघा, बाबुल सुप्रियो आणि त्यांच्या भावी पत्नीची छायाचित्रे...