आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवाजने पहिल्यांदाच दिले बोल्ड सीन्स, म्हणाला - इंटीमेट सीन्स करताना उडाली होती घाबरगुंडी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमाच्या दृश्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बिदिता बेग - Divya Marathi
'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमाच्या दृश्यात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि बिदिता बेग
 
मुंबईः नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आगामी 'बाबूमोशाय बंदूकबाज' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. एखाद्या सिनेमात इंटीमेट आणि लव्ह मेकिंग सीन्स देण्याची ही नवाजची पहिलीच वेळ आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याच्या या बोल्ड सीन्सची चर्चा होत आहे. अभिनेत्री बिदिता बेगसोबत नवाजने बोल्ड सीन्स दिले आहेत. इंटीमेट सीन्स करणे सोपे नव्हते. ते करताना ब-याच अडचणी आल्याचे स्वतः नवाजने ट्रेलर लाँच इव्हेंटमध्ये सांगितले. 

इंटीमेट सीन्स देताना घाबरला होता नवाजुद्दीन...
- इंटीमेट सीन्सचा अनुभव शेअर करताना नवाजुद्दीन म्हणाला, "हे सीन्स करताना मी अतिशय नर्व्हस आणि घाबरलो होतो."
- "पहिल्यांदाच मी स्क्रीनवर इंटिमेट सीन दिले आहेत. त्यामुळे माझी घाबरगुंडी उडाली होती. असे सीन्स करताना तुम्हाला मजा येत नाही, तर मनात घाळमेळ सुरु असते. सोबतच अशा सीन्सवर फोकस करणे अतिशय कठीण असते."
- या सिनेमात नवाजुद्दीनसोबत दिव्या दत्ता आणि बंगाली अभिनेत्री बिदिता बेग यांची महत्त्वाची भूमिका आहे. कुषाण नंदी दिग्दर्शित हा सिनेमा येत्या 25 ऑगस्ट रोजी रिलीज होतोय.

बंदुक चालवण्याचे घेतले ट्रेनिंग.... 
- या सिनेमातील भूमिकेसाठी नवाजने बंदुक चालवण्याचे स्पेशल ट्रेनिंग घेतले.
- या सिनेमासाठी नवाजने जेम्स बॉण्डचे सिनेमे पाहिले.

ग्रे शेड्स पसंत करतो नवाज...
- नवाजने सांगितले, "मला ग्रे शेडच्या भूमिका साकारणे पुर्वीपासूनच आवडतं. पण संपूर्ण व्हिलन किंवा हीरोची भूमिका करणे पसंत नाही."
- "मला वाटतं, जसजसा वेळ जाईल तशा गोष्टी बदलत जातील. आता हीरोजसुद्धा ग्रे शेडच्या भूमिका करतात. माझ्या मते, प्रत्येकात काही चांगल्या तर काही वाईट सवयी असतात."

पुढील स्लाईड्सवर बघा ट्रेलरच्या काही सीन्सचे PHOTOS...
शेवटच्या स्लाईडवर बघा ट्रेलर...
बातम्या आणखी आहेत...