आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Boxoffice: \'बाहुबली २\' ने रचला इतिहास, ३ दिवसांतच कमावले तब्बल 415 कोटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झालेला चित्रपट 'बाहुबली २: द कनक्लुजन' ने बॉक्स ऑफिसवर  धुमाकुळ घातला आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चित्रपटाने भारतात तीनच दिवसात तब्बल 415 कोटींची कमाई करत रेकॉर्ड केला आहे. तर जगभरातील कमाई बघितले तर तो आकडा  540 कोटी इतका झाला आहे. चित्रपटाने पहिल्याच दिवशी 128 कोटींची कमाई केली होती. 270 कोटींच्या बजेटमध्ये बनलेला चित्रपट 'बाहुबली 2' ने रिलीज होण्याअगोदरच थिएटरीकल राईट्स विकत 500 कोटींची कमाई केली आहे. इतकी कमाई करणारा 'बाहुबली 2' हा प्रथम भारतीय चित्रपट ठरला आहे. 
 
 
चित्रपट वीकेंड कलेक्शन
बाहुबली 2 : द कन्क्लूजन (2017)      285 कोटी 
सुल्तान (2016)      180 कोटी 
बाहुबली (2015)      112 कोटी 
दंगल (2016)      108 कोटी 
हैप्पी न्यू ईयर (2014)      106 कोटी 
कबाली (2016)      105 कोटी 
बजरंगी भाईजान (2015)      102 कोटी 
 
- 'सुल्तान'ने तीन दिवसात १०० कोटींचे कलेक्शन केले होते. 'बाहुबली 2' ने पहिल्याच दिवशी १०० कोटीचा आकडा पार केला आहे.
- ट्रेड जर्नलिस्ट रमेश बालाने ट्वीट केले आहे की, बाहुबली २ च्या हिंदी वर्जनने  80 कोटींची कमाई केली आहे. 
- भारतातील 6500 स्क्रिनवर हा चित्रपट रिलीज झाला होता. संपूर्ण जगभरात हा 9000 स्क्रिनवर रिलीज झाला आहे. 
- बुक माय शो वर दर सेकंदाला लिकले गेले 12 तिकीट 
- बुक माय शो चे CEO आशिष हेमराजानीने सांगितले की पहिल्या दिवशी त्याने 10 लाख तिकीट विकले आहेत तर  आता 35 लाख तिकीटे विकली गेली आहेत. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
 
 
 
 
 
 
बातम्या आणखी आहेत...