आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली-2\'चा विक्रम: पहिल्याच दिवशी 115 कोटींची कमाई करणारा पहिला भारतीय चित्रपट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - शुक्रवारी प्रदर्शित झालेला 'बाहुबली 2: द कन्क्ल्यूजन'ने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर 115 कोटींचे कलेक्शन करत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला आहे. या चित्रपटाने कमाईच्या बाबतीत बाहुबली चा पहिला भाग, कबाली, आणि सुलतान यांना मागे टाकले आहे. पहिल्या दिवशीच्या ऑनलाइन तिकीट विक्रीमध्ये या चित्रपटाचे प्रत्येक तिकीट प्रत्येक 12 सेकंदाला विकले गेले. 270 कोटी रुपये बजेट असलेला बाहुबली 2 हा चित्रपट रिलिजच्या पहिल्या दिवशीच नफ्यात आहे. कारण रिलिजपूर्वीच थिएट्रिकल राइट्सची विक्री करुन निर्मात्यांनी 500 कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती. 
 
किती पुढे आहे बाहुबली-2...
सिनेमा फर्स्ट डे कलेक्शन
बाहुबली 2 : द कन्क्ल्यूजन (2017) 115 कोटी रुपये
बाहुबली : द बिगनिंग (2015) 50 कोटी रुपये
कबाली (2016) 49 कोटी रुपये
हॅप्पी न्यू ईयर (2014) 45 कोटी रुपये
प्रेम रतन धन पायो (2015) 40.3 कोटी रुपये
सुल्तान (2016) 36.5 कोटी रुपये
- सुल्‍तानने पहिल्‍या तीन दिवसांत 100 कोटींची कमाई केली होती. 'बाहुबली'ने पहिल्‍याच दिवशी ही कमाई केली आहे.
 
बुक माय शोवर प्रत्‍येक सेकंदाला 12 तिकिटांची विक्री
- बुक माय शोचे सीईओ आशिष हेमराजानी यांनी माहिती दिली आहे की, 'सध्‍या बुक माय शोवर प्रत्‍येक सेकंदाला बाहुबलीच्‍या 12 तिकिटांची विक्री होत आहे. पहिल्‍याच दिवशी बाहुबलीचे 12 लाख तिकिटे विकली गेली. आतापर्यंत 35 लाखांपेक्षा अधिक तिकीटांची बुकींग झाली आहे.'    
 
हिंदी व्‍हर्जनने किती कमावले?
- 'बाहुबली 2' सिनेमाच्‍या हिंदी व्‍हर्जनने आतापर्यंत 38.5 कोटींची कमाई केल्‍याची माहिती ट्रेंड अॅनालिस्‍ट रमेश बाला यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.
- याव्‍यतिरिक्‍त आंधप्रदेश आणि तेलंगनामध्‍ये 53 कोटी, कर्नाटकमध्‍ये 10 कोटी, तामिळनाडुमध्‍ये 9 कोटी आणि केरळमध्‍ये 4.5 कोटींची कमाई सिनेमाने आतापर्यंत केली आहे.
- भारतात 6500 स्‍क्रीन्‍सवर तर जगभरात एकूण 9 हजार स्‍क्रीन्‍सवर हा सिनेमा रिलीज करण्‍यात आला आहे.    
 
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कोणत्‍या सिनेमांनी पहिल्‍या दिवशी चांगली कमाई केली...
 
बातम्या आणखी आहेत...