आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘बाहुबली 2’ ने वसूल केला निर्मितीचा खर्च; संगीतकाराला 5 ते 10 टक्के रक्कम मिळणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचा ‘बाहुबली’ हा चित्रपट हिट झाल्यानंतर आता दुसरा भाग ‘बाहुबली द कन्क्लुजन’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. २५० कोटींच्या या चित्रपटाने प्रदर्शनाआधीच निर्मितीचा खर्च वसूल केला असून आजवर निर्मात्याने प्रदर्शनाआधीच ३०० कोटींची कमाई केली आहे.  

हॉलीवूडमधील ‘अवतार’, ‘जंगल बुक’ व इतर चित्रपटांचा आदर्श घेऊन राजामौली यांनी ‘बाहुबली’ची निर्मिती केली. आता ‘बाहुबली २’साठी संगणकीय करामती घडवण्यात आल्या आहेत.  या चित्रपटाला तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि हिंदी भाषेत प्रदर्शित हक्कासाठी निर्मात्याला १३० कोटी रुपये मिळाले असून तेलुगू भाषेतील अधिकार १३० कोटींना, तर तामिळ भाषेतील चित्रपटाचे अधिकार ४७ कोटींना देण्यात आले आहेत. एवढेच नव्हे, तर चित्रपटाचे सॅटेलाइट राइट्सही मोठ्या किमतीला विकण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षांपासून मुख्य अभिनेत्याला चित्रपटाच्या व्यवसायात भागीदारी दिली जात असे. मात्र,  या वेळी प्रथमच  बाहुबलीचे संगीतकार एम. एम. किरवानी यांना चित्रपटाच्या व्यवसायात ५ ते १० टक्के भागीदारी देण्यात आली आहे. हा एक नवा पायंडा दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीने पाडला आहे.  २८ एप्रिल रोजी ६५०० पडद्यांवर बाहुबली २ प्रदर्शित होणार असून हा एक विक्रमच आहे.   

मराठीला प्रेक्षक मिळत नाहीत  
बाहुबलीमध्ये मोठे अभिनेते नसतानाही तो प्रचंड चालला. प्रेक्षकांना गुंतवून ठेवणारा भव्यदिव्य चित्रपट असेल तर तो नक्कीच चालतो. आमिर खानच्या ‘दंगल’ने ३०० कोटींचा व्यवसाय केला आहे. दक्षिणेतील चित्रपटांची हिंदी चित्रपटांशी स्पर्धा नसते. त्यामुळे ते कोट्यवधी रुपयांचा व्यवसाय करतात. मराठी चित्रपटासाठी दहा कोटी रुपये कोणी खर्च करणार नाही कारण आपली स्पर्धा हिंदीशी आहे. महाराष्ट्रात मराठी चित्रपटांना प्रेक्षक मिळत नाहीत ही शोकांतिका आहे. 
- महेश मांजरेकर, दिग्दर्शक व अभिनेता  
बातम्या आणखी आहेत...