आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Box-Office Report: \'बाहुबली\'चा 300 कोटींचा गल्ला, 9 दिवसांत रचले 9 विक्रम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई- निर्माता एस एस राजामौलीच्या 'बाहुबली' सिनेमाने रिलीजच्या 9 दिवसांत 300 कोटींचा बिझनेस केला आहे. बॉक्स ऑफिसवर इतकी मोठी कमाई करणारा हा पहिलाच दाक्षिणात्य सिनेमा आहे. यापूर्वी दक्षिण सुपरस्टार रजनीकांत यांच्या 'एंथिरन' सिनेमाने जवळपास 290 कोटींचा व्यवसाय केला होता.
ट्रेड अॅनालिस्ट त्रिनाथ यांनी सांगितले, 'शनिवारी (18 जुलै) सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 50 कोटी रुपये कमावले असून डब सिनेमांच्या कमाईच्या क्षेत्रात नवीन विक्रम रचला आहे. या शुक्रवारी (17 जुलै) सलमान खानचा 'बजरंगी भाईजान' रिलीजनेसुध्दा 'बाहुबली'च्या कमाईत जराही फरक पडला नाही.'
निर्माते राजू हिराणी यांचा 'पीके' सिनेमा याच वर्षी जानेवारीमध्ये 300 कोटी कमावणारा बॉलिवूडचा सिनेमा ठरला होता. परंतु 'पीके'ने 300 कोटींची कमाई रिलीजच्या तिस-या आठवड्यात केली होती. 'बाहुबली'ने केवळ 9 दिवसांत 300 कोटी कमावले आहेत.
प्रभास, राणा दग्गुबती, अनुष्का शेट्टी आणि तमन्ना भाटीया स्टारर हा सिनेमा 10 जुलै रोजी रिलीज झाला होता. रिलीजच्या 9 दिवसांत सिनेमा 9 विक्रम रचले आहेत. केवळ 9 दिवसांत
'बाहुबली'ने कसे विक्रम रचले, जाणून घेण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...