आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 'Bahubali' Baahubali Poster Breaks Guinness World Record

'बाहुबली'च्या पोस्टरचा नवा विक्रम, गिनीज वर्ल्ड बुकमध्ये झाली नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एन्टरटेन्मेंट डेस्कः दिग्दर्शक एसएस राजामौली यांच्या सुपरहिट ठरलेल्या 'बाहुबली' या सिनेमाच्या नावी नवीन रेकॉर्डची नोंद झाली आहे. कोच्ची येथे 'बाहुबली'च्या 50 हजार चौरस फुटातील महाकाय पोस्टरची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झाली आहे. चित्रपट इतिहासाचे सर्व रेकॉर्ड मोडणारा एस. एस. राजमौली यांचा 'बाहुबली' हा सर्वाधिक खर्चाचा सिनेमा ठरला आहे. 300 कोटींहून अधिक खर्च या सिनेमावर झाला आहे. या सिनेमासाठी ग्लोबल युनायटेड मीडियाने हे पोस्टर तयार केले होते. त्यांची नोंद गिनीज बुकमध्ये झाली आहे. या यशाबद्दल सिने निर्माते आणि दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी ग्लोबल युनायटेड मीडियाच्या टीमचे अभिनंदन केले आहे.
दिग्दर्शक राजामौली यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवर वेबसाइटचली लिंक शेअर करुन ट्विट केले, Now it is officially awarded.. Congratulations to Mr. Prem Menon and his team at global United media."
प्रभास आणि राणा डग्गुबती स्टारर या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर कमाईचे नवे रेकॉर्ड प्रस्थापित केले आहेत. 10 जुलै रोजी रिलीज झालेल्या या सिनेमाने रिलीजच्या 12 दिवसांत 375 कोटींचा वर्ल्डवाइड बिझनेस केला आहे.
कसे तयार झाले 'बाहुबली'चे महाकाय पोस्टर, पाहा पुढील स्लाईडमध्ये...