आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'बाहुबली\'ने रचला नवा विक्रम, हिंदी व्हर्जनची कमाई 100 कोटींच्या पार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दिग्दर्शक एस. एस. राजामौलीच्या \'बाहुबली\' सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने 100 कोटींचा आकडा पार केला आहे. सिनेमाच्या हिंदी व्हर्जनने रविवारी (2 ऑगस्ट ) 3.40 आणि सोमवारी (3 ऑगस्ट) 1.52 कोटींची कमाई केली आहे. आतापर्यंत एकूण कलेक्शनवर नजर टाकली तर दिसते, की सिनेमाची 1.5.03 कोटी रुपयांची कमाई झाली आहे. \'बाहुबली\'पूर्वी कोणत्याच दक्षिण भारतीय सिनेमाने अशाप्रकारे विक्रम रचलेला नाहीये. रजनिकांत स्टारर \'एंथिरन\' (रोबोट, हिंदी व्हर्जन) 26 कोटींच्या कलेक्शनसोबत आता पर्यंतचा सर्वात जास्त कमाई करणारा दाक्षिणात्य सिनेमा ठरला होता. 
 
वर्ल्डवाइड कलेक्शन 504 कोटी रुपये- 
माध्यमांच्या रिपोर्ट्सनुसार, वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर \'बाहुबली\'चे ग्रॉस कलेक्शन 504.35 कोटी रुपये झाले आहे. सिनेमाने 25व्या दिवशई अर्थातच सोमवारी (3 ऑगस्ट) जवळपास 4.55 कोटी रुपयांची कमाई केली. सिनेमाचे 24 दिवसांचे ग्लोबल कलेक्शन 499.8 कोटी रुपये झाले होते.  
 
10 जुलैला रिलीज झाला होता सिनेमा- 
\'बाहुबली\' 10 जुलैला रिलीज झाला होता. प्रभास, राणा दुग्गबती, तमन्ना भाटीया आणि अनुष्का शेट्टी स्टारर या सिनेमाने पहिल्याच दिवशी 60 कोटींती कमाई करून विक्रम रचला होता. वर्ल्डवाइड बॉक्स ऑफिसवर पहिल्या दिवशी सर्वात जास्त कमाई करणारा हा पहिला भारतीय सिनेमा आहे. त्यानंतर 44.97 कोटींचे कलेक्शन करणारा शाहरुख खान स्टारर \'हॅप्पी न्यू इअर\' सिनेमाचा नंबर येतो. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या \'बाहुबली\'च्या बॉक्स ऑफिसवरील आतापर्यंतच्या विक्रमांविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...