आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bahubali Jewellery From Jaipur Cease By Sales Tax

'बाहुबली'चे जयपूर कनेक्शन, सिक्वेलसाठी पाठवण्यात आलेली 5 कोटींची ज्वेलरी जप्त

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूरच्या अँटिक ज्वेलरीत सिनेमाची स्टारकास्ट. - Divya Marathi
जयपूरच्या अँटिक ज्वेलरीत सिनेमाची स्टारकास्ट.

जयपूरः 'बाहुबली' या गाजलेल्या सिनेमाच्या सिक्वेलच्या फोटोशूटसाठी पाठवण्यात आलेली जयपूरची ज्वेलरी सेल्स टॅक्स विभागाने आपल्या ताब्यात घेतली आहे. जयपूरच्या सात ते आठ ज्वेलरी मालकांनी हैदराबाद येथे सिनेमाच्या निर्मात्याकडे जवळजवळ पाच कोटींची ज्वेलरी पाठवली होती. मात्र यापैकी दोन ज्वेलरी फर्म्सच्या सुमारे दीड कोटींच्या ज्वेलरीवर कर आकारणी विभागाने कर चोरीचा आरोप लावला आहे.
ज्वेलरी संबंधित कागदपत्रे विभागाकडे सुपूर्त करण्यात आली आहेत. 'बाहुबली'च्या सिक्वेलचे फोटोशूट संपल्यानंतर ज्वेलरी हैदराबादहून जयपूरकडे परत पाठवताना ही जप्तीची कारवाई करण्यात आली. यामध्ये सोने, चांदी आणि गोल्ड प्लेटेड ज्वेलरीचा समावेश आहे. या दागिन्यांना 27 पार्सलमध्ये ठेवण्यात आले होते. 'बाहुबली'च्या पहिल्या भागासाठीदेखील जयपूरच्या दागिन्यांचा वापर करण्यात आला होता.
काय असतो ट्रांजिट फॉर्म?
एखादी वस्तू किंवा दागिने राज्याबाहेर पाठवताना ट्रांजिट फॉर्म महत्त्वाचा असतो. याचा अर्थ असा असतो, की संबंधित वस्तू ही विक्रीसाठी पाठवण्यात आलेली नाही. वस्तू परत येत असताना हा फॉर्म दाखवणे गरजेचा असतो.
'बाहुबली'च्या पहिल्या भागात जयपूर ज्वेलरीचा वापर
ज्वेलर राजीव अरोरा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यापूर्वी 'द बेस्ट एग्जॉटिक मेरीगोल्ड', 'सावंरिया' आणि 'रामलीला' या सिनेमांसाठी जयपूर ज्वेलरीचा वापर करण्यात आला होता. मात्र 'बाहुबली' यासाठी खास आहे, कारण यामध्ये केवळ अभिनेत्रीच नव्हे तर हीरो प्रभासनेदेखील सिनेमाच्या मागणीनुसार, ज्वेलरी घातली होती. त्याच्यासाठी खास ज्वेलरी डिझाइन करण्यात आली होती. ती ज्वेलरी चांदीपासून तयार करण्यात आली होती आणि नंतर त्यावर सोन्याचा मुलामा लावण्यात आला होता.
'बाहुबली' तेलगूसोबतच हिंदीतदेखील धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरमध्ये सर्वत्र रिलीज झाला होता.
राजामौलींचा हा सिनेमा आपल्या एपिक अंदाजामुळे प्रेक्षकांच्या पसंतीस पडला होता.
अधिकारी म्हणाले, ट्रांजिट फॉर्म देणे गरजेचे होते, आता 5 टक्के टॅक्स आणि दंड भरावा लागणार
अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार, जॉब वर्कसाठी जेव्हा ज्वेलरी किंवा सामान राज्याबाहेर जाते, तेव्हा ट्रांजिट फॉर्म भरावा लागतो. दोन फर्म्स वगळता इतरांनी ट्रांजिट फॉर्म भरला होता. दोन्ही फर्म्सच्या ज्वेलरीची किंमत दीड कोटींच्या जवळपास आहे. यावर 1 टक्का वॅट आणि 4 टक्के दंड वसूल केला जाईल.
ट्रांजिट फॉर्मची गरज नाही, कारवाई चुकीची : ज्वेलर
जयपूरची प्रसिद्ध फर्म आम्रपालीचे मालक राजीव अरोरा यांच्या मते, जप्त करण्यात आलेली ज्वेलरी ही विक्टोरिअन आहे. यावर नो कमर्शिअल व्हॅल्यू टॅग लावण्यात आला होता. त्यामुळे ट्रांजिट फॉर्मची गरज नव्हती. विभागाने केलेली कारवाई चुकीची आहे.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, जयपूर ज्वेलरीमध्ये 'बाहुबली'ची स्टारकास्ट...