आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रणवीर-दीपिका-प्रियांका स्टारर बाजीराव मस्तानीचा Trailer रिलीज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
('बाजीराव मस्तानी'च्या ट्रेलरमधील रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राचा लूक.)
मुंबईः निर्माता-दिग्दर्शक संजय लीला भन्साळींच्या आगामी 'बाजीराव मस्तानी' या सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. 2.57 मिनिटांच्या या ट्रेलरमध्ये रणवीर सिंह, दीपिका पदुकोण आणि प्रियांका चोप्राची दमदार झलक बघायला मिळत आहे. हा सिनेमा मराठी योद्धा बाजीरावांच्या आयुष्यावर आधारित आहे. या सिनेमात रणवीर सिंहने मराठी योद्धा बाजीरावची भूमिका वठवली आहे. दीपिका पदुकोण बाजीरावांची दुसरी पत्नी मस्तानीच्या भूमिकेत आहे. तर प्रियांका चोप्राने त्यांची पहिली पत्नी काशीबाईची भूमिका वठवली आहे.
ट्रेलरची सुरुवात युद्धाच्या दृश्याने होते. यामध्ये रणवीर सिंह आणि दीपिका पदुकोण तलवारबाजी करताना दिसत आहेत. तर काशीबाईची भूमिका वठवणारी प्रियांका साध्या रुपात दिसत आहे. ट्रेलरमधील दृश्ये, स्टार्सचा अभिनय, बॅक ड्रॉप, बॅकग्राउंड स्कोअर बघता संजय लीला भन्साळी यांनी सिनेमावर भरपूर मेहनत केली असल्याचे दिसून येत आहे. ट्रेलरच्या शेवटी रणवीर म्हणतो, "बाजीराव ने मस्तानी से मोहब्बत की है अय्याशी नहीं।"
इरॉस इंटरनॅशनल आणि संजय लीला भन्साळींच्या प्रॉडक्शनमध्ये तयार होत असलेला हा सिनेमा यावर्षी 18 डिसेंबरला रिलीज होणार आहे. याच दिवशी सुपरस्टार शाहरुख खानचा 'दिलवाले' हा सिनेमासुद्धा रिलीज होणारेय.
पुढील स्लाईड्समध्ये 'बाजीराव मस्तानी'ची खास छायाचित्रे...
नोटः युट्यूबवर अद्याप ट्रेलर अपलोड करण्यात आलेला नाही. त्यामुळे आम्ही तो तुमच्यासोबत शेअर करु शकत नाही. इरॉसने आपल्या ऑफिशिअल वेबसाइटवर हा ट्रेलर रिलीज केला आहे. हा ट्रेलर बघण्यासाठी येथे क्लिक करा....