आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Bajirao Peshwa Family Upset With The Portrayal Of Kashibai And Mastani

Pinga Controversy: काशीबाई-मस्तानीची प्रतिमा मलिन केली, SLBवर बाजीरावांच्या वंशजांचा आरोप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या संजय लीला भन्सालींच्या ‘बाजीराव मस्तानी’ ह्या चित्रपटातल्या ‘पिंगा’ गाण्यावर सोशल नेटवर्किंग साइट्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटतं असताना, पेशव्यांची १३वी पिढीही नाराज आहे. बाजीराव पेशवे, काशीबाई आणि मस्तानी ह्यांची प्रतिमा ह्या चित्रपटाच्या माध्यमातून मलिन केल्याची प्रतिक्रिया divyamarathi.comशी बोलताना १३व्या पिढीतले पुष्कर पेशवा, महेंद्र पेशवा आणि मोहिनी पेशवा-करकरे ह्यांनी व्यक्त केली आहे.
मोहिनी पेशवा करकरे ह्या कॉन्ट्रोवर्सीवर प्रतिक्रिया देताना म्हणतात, “१०० वर्ष राज्य करणा-या पेशव्यांवर संजय लीला भन्साली ह्यांनी किती संशोधन आणि अभ्यास केलाय, हे त्यांचं त्यांनाच ठावूक. पेशवेच नाही, तर इसवी सन १७००मध्ये वावरणारी महाराष्ट्रीयन लोकं, त्यांची भाषा, त्यांचा पेहराव, त्यांची शालिनता आणि त्यांची संस्कृती ह्याविषयी भन्सालींना काही माहिती आहे, का? असा प्रश्न पडावा. 'बाजीराव मस्तानी' चित्रपट आम्हांला दाखवण्यात आला नाही. त्या चित्रपटाचं कथानक, संहिता ह्याविषयीही आम्हांला माहिती नाही. भन्साली हे एक नावाजलेले फिल्ममेकर आहेत. त्यामूळे आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला होता. आमच्या कुटूंबानें त्यांना बाजीरावांच्या प्रतिमेला धक्का न लागता, खराखूरा इतिहास दाखवण्याची विनंती केली होती. पण ‘पिंगा’ गाणे पाहिल्यावर त्यांना असलेली पेशव्यांची आणि इतिहासाची अर्धवट माहितीच समोर येतेय.”
पुष्कर पेशवा म्हणतात, “आम्ही कालच पिंगा गाणं पाहिलं. एक तर हे इतिहासाला पकडून केलेलं गाणं नाही. मसालेदार फिल्मसाठी केलेलं गाणं दिसून येतंय. काशीबाई आणि मस्तानी ह्या दोन व्यक्ती कधीच एकत्र आल्या नाहीत. त्यामूळे नाचण्याचा तर प्रश्नच नाही. आम्हांला कधीही भन्सालींनी ह्या चित्रपटाची स्क्रिप्ट दाखवली नाही. त्यामूळे कथा काय हे मला ठावूक नाही. आता हा 'पिंगा' गाण्याचा ड्रीम सिक्वेन्स आहे का, हे ही समजत नाही. काशीबाईसाहेब किंवा मस्तानी बाईसाहेब ह्या राजघराण्यातल्या बायकांची चालण्याची, उठण्या-बसण्याची, पेहरावाची पध्दत खूप घरंदाज पध्दतीची होती. त्या कधी भरभर चालतंही नसतं. त्यामूळे तर ठूमके मारत, लावणी करत नाचणं दूरान्वयानेही येऊ शकत नाही.”
महेंद्र पेशवा म्हणतायत, “आमचा गाण्यांवर आक्षेप आहे. काशीबाई आणि मस्तानी फक्त एकदाच भेटल्या असल्याचा इतिहासकारांचा निर्वाळा आहे. आमच्या घराण्याच्या राण्यांना पिंगा गाण्यात अंगप्रदर्शन करताना पाहणं, आमच्यासाठी दु:खदायकच आहे.”
बाजीराव पेशव्यांच्या ३१५व्या जयंती निमीत्त पूर्ण कुटूंब सेटवर गेलं होतं. त्यावेळी काय झालं सांगतायत पेशव्यांचे वंशज