आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'भाईजान'साठी लकी आहे ईद, 5 सिनेमांनी बॉक्स ऑफिसवर कमावले 780 कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः सुपरस्टार सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' हा सिनेमा शुक्रवारी (17 जुलै) रोजी थिएटरमध्ये दाखल झाला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेला हा सिनेमा सलमानच्या फॅन्ससाठी ईदीपेक्षा कमी नाही. सिनेमातील गाणी, प्लॉट आणि सलमानची लोकप्रियता यामुळे प्रेक्षक या सिनेमाची आतुरतेने वाट बघत होते.
तसे पाहता ईदचा मुहूर्त सलमानसाठी नेहमीच लकी ठरला आहे. ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले त्याचे सिनेमे उत्तम कलेक्शन करत असल्याचे मागे वळून बघता आपल्या लक्षात येईल. किक (2014), बॉडीगॉर्ड (2011), एक था टाइगर (2012), दबंग (2010), वॉन्टेड (2009) हे सलमानचे ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेले सिनेमे आहेत.
या सिनेमांना सलमानच्या लोकप्रियतेचा फायदा झाला आणि बॉक्स ऑफिसवर त्यांनी कोटीच्या कोटी उड्डाणे घेतली. 'किक'ने 223 कोटी, 'एक था टाइगर'ने 199 कोटी, 'बॉडीगॉर्ड'ने 145 कोटी, 'दबंग'ने 141 कोटी तर 'वॉन्टेड'ने 61 कोटींची कमाई केली. या पाचही सिनेमांचा एकुण बिझनेस 780 कोटी इतका आहे. एक नजर टाकुया ईदच्या मुहूर्तावर रिलीज झालेल्या सल्लू मियाँच्या मागील सिनेमांवर...
सिनेमाचे नाव : किक (2014)
डायरेक्टर: साजिद नाडयाडवाला
को-स्टार्स: जॅकलिन फर्नांडिस, रणदीप हुड्डा, नवाजुद्दीन सिद्दिकी
कलेक्शन: 233 CR
पुढील स्लाईड्समध्ये वाचा, ईदला रिलीज झालेल्या सलमानच्या सिनेमांविषयी...