('बजरंगी भाईजान'च्या एका सीनमध्ये सलमान खान आणि हर्षाली मल्होत्रा)
मुंबई- सलमान खान आणि करीना कपूर स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमा बॉक्स ऑफिसवर कमाई करतच आहेत. सिनेमाने दुस-या रविवारी (26 जुलै) 24.05 कोटींचे (भारतात) कलेक्शन केले. भारतात बॉक्स ऑफिसया सिनेमाने आतापर्यंत 240.72 कोटी रुपयांची कमाई केली आहे.
ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्शच्या सांगण्यानुसार, 'बजरंगी भाईजान'ने मागील सिनेमा 'किक' (भारतातील कमाई 232 कोटी)चा रेकॉर्ड मोडित काढत सलमानच्या आतापर्यंतच्या सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे.
सिनेमाने पहिल्या आठवड्यात (गुरुवारपर्यंत) परदेशात 83.29 कोटींचा बिझनेस केला होता. काही वेबसाईटनुसार, दुस-या रविवारपर्यंत सिनेमाचे कलेक्शनसुध्दा 100 कोटीच्या पुढे झाले आहे आणि सिनेमाची वर्ल्डवाइड कमाई 350 कोटी रुपये इतकी झाली आहे. त्यासोबतच जगभरात सर्वाधिक कमाई करणारा 8वा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा तरण आदर्शचे आताचे टि्वट्स आमि सिनेमाचे फस्ट आणि रनिंग वीकचे Day-By-By कलेक्शन...