('बजरंगी भाईजान'च्या एका सीनमध्ये सलमान खान)
मुंबई- सलमान खान आणि करीना कपूर स्टारर 'बजरंगी भाईजान' सिनेमाने परदेशात भारतीय सिनेमांच्या 100 कोटीं क्लबमध्ये सामील झाला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या सांगण्यानुसार, रिलीजच्या दुस-या रविवारी परदेशात सिनेमा 115.59 कोटींचा गल्ला जमवला आहे. तसेच तिस-या आठवड्यात मंगळवारपर्यंत (28 जुलै) भारतात बॉक्स ऑफिसवर सिनेमाने 259.12 कोटींचा व्यवसाय केला आहे. मंगळवारी भारतात सिनेमाचे कलेक्शन 9.10 कोटी रुपये झाले. हे आकडे सिनेमाच्या नेट कलेक्शनचे आहेत. जर ग्रॉस कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर सिनेमाने भारतात 346.10 कोटींची कमाई केली. तसेच याचे वर्ल्डवाईड ग्रॉस कलेक्शन 461.11 कोटी झाले.
शाहरुखच्या 'चेन्नई एक्स्प्रेस'ला टाकले मागे-
शाहरुख खान स्टारर 'चेन्नई एक्स्प्रेस' (भारतातील नेट- 226 कोटी, परदेशातील- 121 कोटी, भारतातील ग्रॉस- 301 कोटी, वर्ल्डवाइड- 422 कोटी)ला मागे टाकत 'बजरंगी भाईजान' आतापर्यंत सर्वाधिक कमाई करणारा तिसरा बॉलिवूड सिनेमा ठरला आहे. या यादीत आमिर खान स्टारर 'पीके' पहिल्या आणि 'धूम 3' दुस-या क्रमांकावर आहेत.
सर्वाधिक नफा मिळवणारा वर्षाचा दुसरा सिनेमा-
'बजरंगी भाईजान' 2015चा दुसरा सर्वाधिक नफा मिळवणारा (177%) सिनेमा ठरला आहे. या यादीत 'तनु वेड्स मनु' (390% नफा) पहिल्या क्रमांकावर आहे. दिग्दर्शक कबीर खानचा हा सिनेमा 17 जुलै रोजी रिलीज झाला होता. सिनेमामध्ये सलमान आणि करीनाशिवाय नवाजुद्दीन सिद्दीकी आणि हर्षाली मल्होत्रासुध्दा मुख्य भूमिकेत आहेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, सिनेमाचे आतापर्यंतचे Day-By-Day कलेक्शन आणि वाचा तरण आदर्शचे टि्वट...