आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

6 दिवसांत 238 कोटींचा गल्ला, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार \'भाईजान\' सलमान

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'बजरंगी भाईजान'च्या एका दृश्यात सलमान खान आणि करीना कपूर खान - Divya Marathi
'बजरंगी भाईजान'च्या एका दृश्यात सलमान खान आणि करीना कपूर खान
मुंबईः सलमान खान स्टारर 'बजरंगी भाईजान' या सिनेमाने रिलीजच्या सहा दिवसांत 'किक' या सिनेमाच्या कलेक्शनला मागे टाकले आहे. 'किक' या सिनेमाचे सहा दिवसांत 164 कोटी कलेक्शन झाले होते. तर सलमानच्या या लेटेस्ट सिनेमाने बुधवारपर्यंतच 169.7 कोटींचा गल्ला जमवला आहे. ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांच्या मते, बुधवारी या सिनेमाने 18.02 कोटींची कमाई केली. मंगळवार ओवरसीजमध्ये याची कमाई 69.05 कोटी इतकी राहिली. वर्ल्डवाइड सिनेमाचे एकुण कलेक्शन 238.12 कोटी इतके झाले आहे.

दुष्काळग्रस्त शेतक-यांना करणार मदत
सलमान खान आता बळीराजाच्या मदतीला धावून जाणार आहे. दुष्काळाच्या चिंतेने खचलेल्या, कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या आणि आत्महत्येचा मार्ग पत्करणाऱ्या शेतकऱ्यांना सावरण्यासाठी 'बजरंगी भाईजान'च्या कमाईतील एक वाटा देण्याची तयारी निर्माता सलमान आणि सहनिर्माता आर. व्यंकटेश यांनी दाखवली आहे. भाजप नेत्या शायना एनसी यांच्यासोबत सल्लूची बहीण अलविरा आणि कबीर खान यांनी अलीकडेच महसूलमंत्री एकनाथ खडसे यांची भेट घेतली. राज्यातील आमदारांसाठी आयोजित केलेल्या 'बजरंगी भाईजान'च्या खास शोचे आमंत्रण त्यांनी दिले. सोबतच, शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्तावही त्यांच्यापुढे ठेवला आहे. त्यासाठी राज्य सरकारने 'बजरंगी भाईजान' टॅक्स फ्री करणे गरजेचे आहे. तसे झाल्यास बळीराजाला मोठा दिलासा मिळू शकेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा, बजरंगी भाईजानच्या कमाईविषयी ट्रेड अॅनालिस्ट तरण आदर्श यांनी केलेले ट्विट्स आणि सिनेमाचे आत्तापर्यंतचे day-by-day कलेक्शन..